निरनिराळ्या प्रकारचे इक्विटी फंड

Video

इक्विटी फंडसाठी सर्वात मुख्य जोखीम म्हणजे मार्केट जोखीम. स्टॉक मार्केटला प्रभावित करणाऱ्या अनेक कारणांमुळे रोख्यांच्या किंमतीमध्ये होणारे नुकसान यालाच मार्केट जोखीम म्हटले जाते. म्हणून, मार्केट जोखीमला सिस्टिमची जोखीमसुद्धा म्हटले जाते, म्हणजेच अशी जोखीम जी डायव्हर्सिफिकेशन केल्याने संपत नाही.

मार्केट जोखमीची अनेक कारणे असू शकतात, जसे मॅक्रोइकॉनॉमिक ट्रेंड, वैश्विक आर्थिक संकट, राजनैतिक अस्थिरता किंवा नियामक संस्थेकडून केलेले बदल. इक्विटी फंडवर प्रभाव पाडणाऱ्या मार्केट जोखमीचा सर्वात मोठा घटक म्हणजे इक्विटीच्या किंमतींची जोखीम. जेव्हा मार्केट पडते, तेव्हा सर्व स्टॉकच्या किंमतीवर प्रभाव पडतो ज्यामुळे इक्विटी फंडची कामगिरी खालावते. मार्केट जोखमीच्या वरील कारणांशिवाय, इक्विटी फंडवर मार्केट जोखमीच्या एका इतर घटकाचा, म्हणजेच चलन मुद्रेच्या जोखमीचा सुद्धा प्रभाव पडतो. चलन मुद्रेची जोखीम कुठल्याही अशा फंडसाठी प्रासंगिक असते जे फंड अनेक देशांत काम करणाऱ्या कंपनींमध्ये गुंतवणूक करतात.

इक्विटी फंड अनेक उद्योगांतील किंवा सेक्टरमधील अनेक कंपनींमध्ये गुंतवणूक करतात त्यामुळे त्यांना उद्योग जगताच्या जोखमीला सुद्धा सामोरे जावे लागते, म्हणजेच एखाद्या उद्योगातील सर्व कंपनींवर प्रतिकूल प्रभाव पाडणारी एखादी जोखीम. इक्विटी फंडवर एखाद्या कंपनीवर प्रतिकूल प्रभाव पाडणाऱ्या बाबींचासुद्धा प्रभाव पडू शकतो, जसे एखाद्या कंपनीच्या धोरणांत किंवा व्यवस्थापनात झालेला बदल. याला कंपनी-विशिष्ट जोखीम म्हटले जाते. उद्योग आणि कंपनी-विशिष्ट जोखमींना अनसिस्टॅमिक जोखीम म्हणतात आणि काही अंशी यांना डायव्हर्सिफिकेशन करून कमी करता येते.

454

म्युच्युअल फंड सही आहे?