जेव्हा आपण एखाद्या डिस्ट्रिब्यूटरच्या किंवा इतर मध्यस्थाच्या माध्यमाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता, तेव्हा आपण त्या स्किमच्या रेग्युलर प्लॅनमध्ये गुंतवणूक करता. मध्यस्थाच्या माध्यमाने गुंतवणूक करण्याचे काही फायदे आहेत. आपल्या शॉर्ट टर्म आणि दिर्घकालीन उद्दिष्टांसाठी योग्य अशा स्किमची निवड करण्यात डिस्ट्रिब्यूटर आपली मदत करू शकतात. डिस्ट्रिब्यूटर आपल्यासाठी केवायसी सारख्या प्रक्रिया पूर्ण करण्यात, तसेच एसआयपी/ एसडब्ल्यूपी/ एसटीपी सुरू करण्यात मदत करतात आणि जर आपण पहिल्यांदा गुंतवणूक करीत असलात तर फॉर्म भरण्याची कामे सुद्धा करतात.
जेव्हा आपली वित्तीय उद्दिष्टे बदलतात, किंवा जेव्हा लाभ बुक करून किंवा निवडलेले ऐसेट ऐलोकेशन(मालमत्ता वितरण) तसेच राखायचे असल्यास आपल्या पोर्टफोलिओचे रीबॅलंसिंग करायची गरज असते, तेव्हा डिस्ट्रिब्यूटर पोर्टफोलिओमध्ये बदल करून आपली मदत करतात. आपला पोर्टफोलिओ अप टू डेट आहे याची खात्री करून देण्यासाठी, गरज असेल तेव्हा पत्ता बदलणे किंवा नॉमिनी बदलणे असा आपला खाजगी तपशील अपडेट करून देण्यासाठी मध्यस्थ
अधिक वाचा