म्युच्युअल फंड बाजाराशी निगडित उत्पादने आहेत ज्यांच्यासोबत अनेक प्रकारच्या जोखमी असतात आणि त्यांच्या परताव्याची हमी नसते. योग्य म्युच्युअल फंड निवडण्यासाठी त्याच्या गुंतवणूक उद्दिष्टांसोबतच परताव्याची शक्यता आणि त्याच्या जोखमीचे मूल्यांकन या बाबींकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. प्रत्येक गुंतवणूकदाराचे व्यक्तिमत्त्व जोखमीबद्दलच्या प्राधान्यांच्या बाबतीत निराळे असते त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदारासाठी म्युच्युअल फंडची निवड निराळी असते. जोखीम प्राधान्यांसोबतच प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनामध्ये एक उद्दिष्ट असते जे मूल्य आणि कालावधी यांच्याप्रमाणे प्रत्येकाचे निराळे असते. त्यामुळे योग्य म्युच्युअल फंड निवडण्यासाठी आपल्याला अनेक फंडांची तुलना जोखीम-परतावा-कालावधी या मेट्रिकवर करावी लागते.
याला समजण्यासाठी एक उदाहरण घेऊया. एक 30 वर्षाची व्यक्ती आणि एक 50 वर्षाची व्यक्ती दोघेही आपापल्या रिटायरमेंटसाठी गुंतवणूक करीत असले तरीही त्यांची फंडची निवड निराळी असेल. 30 वर्षाची व्यक्ती अधिक जोखीम पत्करू शकते कारण तिच्याकडे 25-30 वर्षांचा कालावधी आहे, पण 50 वर्षाच्या व्यक्तीला अधिक सावधगिरी पत्करावी लागेल कारण तिचा
अधिक वाचा