आपण अशा किती लोकांना ओळखता ज्यांनी स्टॉक मार्केटमध्ये पैसे गमावलेले आहेत कारण त्यांना अंदाज लावता आला नसेल की यापुढे मार्केट वर जाणार किंवा खाली; तसेच अशा किती लोकांना ओळखता ज्यांनी स्टॉक मार्केटमध्ये भरपूर पैसे कमावले आहेत कारण त्यांना कळले होते की यापुढे मार्केट वर जाणार किंवा खाली? सर्वोत्कृष्ट तज्ज्ञांना सुद्धा नक्की माहीत नसते की उद्या मार्केट चढणार की पडणार कारण आर्थिक बाजार भावनांमुळे (मार्केट सेंटीमेंट) वर-खाली जातात आणि बाजारातील भावनांना (मार्केट सेंटीमेंट) बाजारबद्दलच्या बातम्या चालना देतात.
आज गुंतवणूकदारांना बाजाराबद्दल अशा बातम्या सहज मिळू शकतात ज्या खऱ्या आहेत किंवा ज्या अफवा किंवा फक्त अनुमान आहेत. खऱ्या बातम्यांवर आधारलेल्या गुंतवणुकीच्या निर्णयांमुळे चांगला परतावा मिळू शकतो, तर अफवा किंवा अनुमान-आधारित निर्णयांमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होऊ शकते.
स्वभाव-आधारित वित्त (बिहेवियरल फाइनेंस) सिद्धांताप्रमाणे गुंतवणूकदार स्वाभाविकरीत्या तर्कहीन असतात म्हणजेच त्यांची गुंतवणुकीची पद्धत संपूर्ण शोध आणि विश्लेषणवर आधारलेली नसून आकलनशक्ती आणि भावनात्मक पूर्वाग्रहांवर आधारलेली असते, ज्यात सामूहिक मानसिकतेचा भाग असू शकतो. म्हणूनच, बाजाराबद्दल चुकीच्या माहितीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती पसरू शकते ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीवर मोठा आणि विपरीत प्रभाव पडू शकतो.
अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदाराने चित्तवृत्ती स्थिर कशा ठेवाव्यात जेव्हा खऱ्या आणि खोट्या दोन्ही प्रकारच्या बातम्यांचा पूर आलेला असेल? अशात म्युच्युअल फंड लक्षावधी लहान गुंतवणूकदारांच्या फार कामास येतात कारण मोठा शोध आणि विश्लेषण करणे त्यांच्या आवाक्यात नसते. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्याने वरील सर्व समस्यांना बगल दिली जाते कारण व्यावसायिक फंड व्यवस्थापक आपल्या वतीने गुंतवणुकीचे निर्णय घेतात.
फंड व्यवस्थापकांकडे शोध करणाऱ्या तज्ज्ञांची एक टीम असते जी उपलब्ध सार्वजनिक माहितीवरून संपूर्ण शोध करते आणि प्रत्येक रोख्याला विकत घेताना आणि विकताना त्याचे यथायोग्य मूल्यांकन करते. जर तुमच्या फंडच्या पोर्टफोलिओमधील कोणत्याही सुरक्षिततेबाबत किंवा फंडाविषयी बाजारामध्ये कोणतीही बातमी येते जी तुम्हाला चिंतादायक वाटते, तर तुम्ही मार्गदर्शनासाठी तुमच्या सेबी (SEBI) नोंदणीकृत आर्थिक सल्लागार किंवा म्युच्युअल फंड वितरकाशी संपर्क साधू शकता.