म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे हे आता तुमच्यासाठी अत्यंत सोयीस्कर आहे. साधनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ते सोपे आहेत, ते लवचिक आहेत आणि गुंतवणूकदार सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन पद्धतीद्वारे कमीतकमी 500 रुपयांपासून देखील सुरुवात करू शकतात. म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करण्याच्या काही पद्धतीही आहेत.
म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे विविध मार्ग:
- म्युच्युअल फंड, आयएससी (गुंतवणूकदार सेवा केंद्र) किंवा आरटीए (रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट) यांच्या जवळच्या शाखा कार्यालयास भेट देऊन.
- एएमएफआयकडे नोंदणीकृत फंड वितरकामार्फत. वितरक म्हणजे एखादी व्यक्ती, बँक, ब्रोकर किंवा अन्य.
- फंड हाऊसेसच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंवा पोर्टलच्या माध्यमातून.
प्रत्येक गुंतवणूकदाराची पसंती आणि कौशल्य वेगवेगळे असल्याने सर्वांना एकच पद्धत लागू होत नाही. परंतु या पद्धतींचे ढोबळमानाने वर्गीकरण असे करता येईल - ऑनलाइन आणि ऑफलाइन.
a) ऑनलाइन: गुंतवणूकदार फंड हाऊसच्या पोर्टल आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे म्युच्युअल फंड खाती ऑनलाइन उघडू शकतो.
b) ऑफलाईन: गुंतवणूकदार ऑफलाइन खाते उघडण्यासाठी म्युच्युअल फंड वितरकाशी किंवा जवळच्या म्युच्युअल फंड शाखा कार्यालयाशी
अधिक वाचा