माझ्या गुंतवणुकीपैकी मला किती भाग काढता येईल?

माझ्या गुंतवणुकीपैकी मला किती भाग काढता येईल?

बहुतांश म्युच्युअल फंड स्किम्स या ओपन एन्ड स्किम असतात, ज्यांत गुंतवणूकदाराला कालावधीच्या कोणत्याही निर्बंधाशिवाय संपूर्ण पैसे काढून घेण्याची मुभा असते.

फक्त काही विशिष्ट परिस्थितींमध्येच काही स्किम्सकडून पैसे काढून घेण्यावर निर्बंध घातले जातात, याचा निर्णय त्यांचे विश्वस्त मंडळ घेते.

सर्व इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्किम (ईएलएसएस), ज्यांत पैसे ठेवल्याने कलम 80-सी अंतर्गत मिळकत करामध्ये सूट मिळते, त्यात 3 वर्षांच्या 'लॉक-इन’ कालावधीसाठी गुंतवणूक काढून घेता येत नाही. तरीही, या स्किम्समध्ये या कालावधीमध्ये घोषित केलेला लाभांश काढण्यासाठी कुठल्याही प्रकारचा निर्बंध नाही. असे लॉक-इन, इतर कुठल्याही प्रकारच्या स्किम्स लागू करू शकत नाहीत. काही स्किम्समध्ये वेळेआधी रक्कम काढून घेतल्याबद्दल निर्गमन-भार लागू केला जाऊ शकतो, ज्यामुळे अल्पकालीन गुंतवणुकी स्किम्समध्ये येण्यास प्रतिबंध होतो. कुठल्याही स्किममध्ये किमान किती पैसे गुंतवावे लागतील याचा निर्णय मालमत्ता व्यवस्थापन संस्था AMC घेऊ शकतात. ही सर्व माहिती स्किम-संबंधी दस्तऐवजांमध्ये असते आणि गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूकदाराने

अधिक वाचा

म्युच्युअल फंड सही आहे?