रिस्क-ओ-मीटर आपल्याला म्युच्युअल फंड योजनेसाठी संपूर्ण 'जोखीम' चित्र देण्याचा प्रयत्न करतो. म्युच्युअल फंड योजनेतील प्रत्येक मालमत्ता प्रकाराला जोखीम स्कोअर देऊन हे केले जाते. म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये आढळणारे प्रत्येक कर्ज किंवा इक्विटी इन्स्ट्रुमेंट आणि इतर मालमत्ता जसे की रोख, सोने आणि इतर आर्थिक साधनांना विशिष्ट जोखीम मूल्य दिले जाते.
इक्विटीच्या बाबतीत, पोर्टफोलिओमधील प्रत्येक स्थानाला तीन मुख्य घटकांवर आधारित जोखीम स्कोअर देण्यात आला आहे.
- मार्केट कॅपिटलायझेशन : मिड कॅप शेअर्सपेक्षा स्मॉल कॅप शेअर्समध्ये जास्त जोखीम असते, जे लार्ज कॅप शेअर्सपेक्षा जास्त जोखमीचे असतात. प्रत्येकासाठीचे जोखीम मूल्य दर सहा महिन्यांनी अद्ययावत केले जाते.
- अस्थिरता: दैनंदिन किंमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार असलेल्या शेअर्सना अधिक जोखीम मूल्य देण्यात येते. हे शेअर्सच्या मागील दोन वर्षांतीलकिमतीमध्ये झालेल्या बदलावरून ठरविले जाते.
- इम्पॅक्ट कॉस्ट (लिक्विडिटी)1: कमी ट्रेडिंग व्हॉल्यूम असलेल्या शेअर्समध्ये मोठ्या व्यवहारात किमतीत लक्षणीय बदल होतात. यामुळे इम्पॅक्ट खर्च आणि संबंधित जोखीम मूल्य वाढते.हे