अनेक फिनटेक कंपनी आहेत ज्या फी घेऊन किंवा विनामूल्य सुद्धा डायरेक्ट म्युच्युअल फंड गुंतवणूक करण्याची सवलत देतात. यापैकी बहुतांश प्लॅटफॉर्म सेबी सोबत नोंदणीकृत असल्यामुळे सेबीच्या सुरक्षा आणि गोपनीयता मार्गदर्शक तत्त्वांद्वारे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केलेले आहेत. आजकाल तर फॉर्च्यून 500 कंपनींचे सुद्धा हॅकिंग होते, त्यामुळे म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म सुद्धा हॅकिंगला बळी पडण्याची शक्यता असतेच. तरीही, असे होण्याची शक्यता फारच कमी आहे.
कारण असे बहुतांश प्लॅटफॉर्म सध्या अशा स्टार्टअप्सने सुरू केलेले आहेत ज्यांना बाजारात फार काळ झालेला नाही, त्यामुळे अशी शक्यता असू शकते की ते बंद पडतील किंवा मोठ्या कंपनी त्यांना विकत घेतील. पण आपल्याला या नोंदणी केलेल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने केलेल्या आपल्या गुंतवणुकीची काळजी करण्याचे कारण नाही, कारण जरी भविष्यात हे प्लॅटफॉर्म नाहीसे झाले तरीही आपले पैसे म्युच्युअल फंडच्या खात्यामध्ये असतात आणि प्रत्येका फंडसाठी सेबीने मान्य केलेला रजिस्ट्रार असतो जो आपल्या
अधिक वाचा