ओव्हरनाइट फंड किती सुरक्षित आहेत?

ओव्हरनाइट फंड किती सुरक्षित आहेत?

जर आपण अशा म्युच्युअल फंडच्या शोधात आहात ज्यात नुकसान होण्याची मुळीच शक्यता नाही, तर असा एकही फंड नाही! सर्वच म्युच्युअल फंड मध्ये कुठल्यातरी प्रकारचा जोखीम असतोच. इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये बाजाराचा जोखीम असतो, तर डेब्ट फंडमध्ये व्याज दराचा आणि भरपाईमध्ये कसूर होण्याचा जोखीम असतो. डेब्ट फंडमध्ये पोर्टफोलिओच्या सरासरी परिपक्वता कालावधी प्रमाणे जोखीम कमी किंवा अधिक असतो. डेब्ट फंडच्या पोर्टफोलिओचा परिपक्वता कालावधी जेवढा अधिक असेल, व्याज दराचा जोखीम आणि भरपाईमध्ये कसूर होण्याचा जोखीम तेवढाच अधिक असेल.

ओव्हरनाइट फंड एक प्रकारच्या ओपन एन्ड डेब्ट फंडसारखे असतात जे दुसऱ्या दिवशी पूर्ण होणाऱ्या डेब्ट रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात. म्हणूनच सर्व डेब्ट फंड पैकी यांचा परिपक्वता कालावधी सर्वात कमी असतो. त्यामुळे त्यांत व्याज दराचा जोखीम आणि भरपाईमध्ये कसूर होण्याचा जोखीम सर्वात कमी असतात.

आपण असे मुळीच गृहीत धरू शकत नाही की ओव्हरनाइट फंडमध्ये मुळीच जोखीम नसतो, तरीही असे समजणे योग्य ठरेल की सर्व प्रकारच्या फंडपैकी या फंडमध्ये जोखीम सर्वात कमी असतो. म्हणूनच यांना खूप कमी कालावधीसाठी सर्वात कमी जोखीम पत्करून मोठी रक्कम ठेवण्यासाठी उत्तम समजले जाते जेव्हा उद्दिष्ट फक्त एवढेच असते की भांडवल सुरक्षित राहील आणि परताव्याबद्दल फार अपेक्षा नसते.

454

म्युच्युअल फंड सही आहे?