म्युच्युअल फंड्स मधील एसआयपी (SIP) म्हणजे मॅरेथॉन धावण्यासारखे आहे. मॅरेथॉन धावपटू वर्षभर सराव करतात पण ते दरवर्षी त्याचे ध्येय बदलत राहतात. जसे की ड्रिम रनपासून, हाफ मॅरेथॉन पर्यंत आणि मग शेवटी पूर्ण मॅरेथॉन. एसआयपी (SIP) देखील तसेच आहे.
सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन्स (SIP) हा म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करण्याचा शिस्तबद्ध मार्ग आहे ज्यामुळे आपल्याला दोन फायदे होतात, ते म्हणजे ह्यामध्ये रुपयाच्या किमतीच्या सरासरीमधून बाजारातील चढउताराचे नियोजन होते आणि दीर्घकाळात चक्रवाढीचे लाभ मिळतात. एसआयपी (SIP) हा म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करण्याचा सगळ्यात लोकप्रिय मार्ग ठरला आहे, कारण ते गेली अनेक वर्षे लहान आणि नियमित गुंतवणूकीला वाव देत आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे का आपण ज्या एसआयपी (SIP) रक्कमेने सुरुवात केली होती तीच कायम राहील? तर त्याचे उत्तर आहे - ‘नाही’.
समजा जर आपण इक्विटी म्युच्युअल फंड्स मध्ये दर महिना 3000 रुपये
अधिक वाचा