पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) आणि म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे दोन प्रसिद्ध पर्याय आहेत. गुंतवणुकीच्या या दोन्ही पर्यायांमध्ये त्यांचे स्वतःचे काही फरक आहेत.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) हा दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचा पर्याय असून त्याला भारत सरकारचा पाठिंबा आहे. पीपीएफ गुंतवणूकदारांना खात्रीशीर परतावा देतो. व्याजाचा हा दर भारत सरकारद्वारे दर तिमाहीला निश्चित केला जातो. यात गुंतवणुकीचा कालावधी निश्चित आहे, प्रत्येक आर्थिक वर्षासाठी गुंतवणुकीची रक्कम दरवर्षी किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये असते. पीपीएफची मूळ रक्कम, मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. पीपीएफचा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा असतो, काही वेळा गुंतवणूक केल्याच्या केवळ 7व्या वर्षापासून मुदतपूर्व पैसे काढणे शक्य असते. पीपीएफ हा कमी जोखमीचा गुंतवणूक पर्याय आहे.
तर दुसरीकडे म्युच्युअल फंड हे व्यावसायिकरित्या व्यवस्थापित गुंतवणूक फंड आहेत जे वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करतात. म्युच्युअल फंड विविध गुंतवणूक प्रकारांमध्ये गुंतवणूक करतो,
अधिक वाचा