केवायसी हे “नो युअर कस्टमर” चे संक्षिप्त रूप आहे आणि ही संज्ञा कोणत्याही वित्त संस्थेत ग्राहकाचे खाते उघडण्याच्या प्रक्रियेत ग्राहकाची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेसाठी वापरली जाते एक भाग आहे. केवायसी संबंधित कागदपत्रे, जसे की विहित छायाचित्र पुरावा(उदा. पॅन कार्ड, आधार कार्ड) आणि पत्त्याचा पुरावा तसेच व्यक्ती सत्यापन(इन पर्सन व्हेरिफिकेशन(IPV) यांच्याद्वारे गुंतवणूकदाराची ओळख सिद्ध करतात. केवायसी अनुपालन हे मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा, 2002 आणि त्या अंतर्गत घालून दिलेल्या नियमांतर्गत तसेच ऍन्टी मनी लॉन्ड्रिंग स्टॅन्डर्ड्स(AML)/ कॉम्बॅटिंग द फायनान्शियल टेररिझम(CFT)/ऑब्लीगेशन्स ऑफ सिक्युरिटीज मार्केट इंटरमिडीयेटरीज वरील सेबीच्या (SEBI) मुख्य परिपत्रकाअंतर्गत सक्तीचे आहे.
नो युअर कस्टमर हे साधारणतः 2 भागांत विभागलेले असते:
भाग I मध्ये सेन्ट्रल केवायसी रजिस्ट्री(युनिफॉर्म केवायसी) यांनी विहित केल्याप्रमाणे हे गुंतवणूकदाराचे सामान्य आणि युनिफॉर्म केवायसी तपशील असतात जे सर्व नोंदणीकृत वित्तीय मध्यस्थांकडून वापरले जातात आणि
भाग 2 मध्ये अतिरिक्त केवायसी माहिती असते जी वित्तीय मध्यस्थांकडून जसे की म्युच्युअल फंड, स्टॉक ब्रोकर, गुंतवणूकदाराचे खाते उघडणारे डीपॉझिटरी सहभागी यांच्याकडून वेगळ्या प्रकारे शोधली जाऊ शकते (अतिरिक्त केवायसी).