संभाषणात सामील व्हा
‘म्युच्युअल फंड सही है’ ही गुंतवणूकदारांना माहिती देण्याची आणि जागरूक करण्याची चळवळ मार्च 2017 मध्ये सुरू झाली होती. ही चळवळ सर्व प्रांतांतील आणि सर्व भाषा वापरणाऱ्या भारतीय नागरिकांपर्यंत टीव्ही, डिजिटल, छापील आणि इतर मीडियाच्या माध्यमाने पोहोचली आहे. या वेबसाईटच्या माध्यमाने अनेक लोकांनी म्युच्युअल फंड्सबद्दल माहिती मिळवली आहे. या वेबसाईटवर म्युच्युअल फंड्सबद्दल सोप्या भाषेत मजकूर आहे ज्यात लेख आणि व्हिडिओ आहेत जे भावी गुंतवणूकदारांना समजण्यासाठी अगदी सोपे आहेत. या वेबसाईटवर इतर साधने आणि कैलकुलेटर सुद्धा आहेत जे आपल्याला आपल्या आयुष्यातील उद्दिष्टांसाठी अगदी सहजपणे नियोजन करण्यास मदत करतात. आपण दिलेल्या इनपुटच्या आधारे, हे कैलकुलेटर आपल्याला सांगतात की आपण आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी किती गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
पाहिले गेलेले एकूण पृष्ठ (पेजेस)
27,86,58,697
मोजली गेलेली गुंतवणूक उद्दिष्टे
2,04,05,591
पोर्टफोलिओची एकूण संख्या
20.45 कोटी
31 ऑगस्ट 2024 रोजी.