गुंतवणुकीसाठी वापरलेल्या सिक्युरिटीजच्या आधारे, तसेच त्या सिक्युरिटीजच्या मुदतपूर्तीच्या कालावधीच्या आधारे डेब्ट फंड्सचे निरनिराळे प्रकार आहेत. डेब्ट सिक्युरिटीजमध्ये कंपनी, बँक आणि सरकारने जारी केलेले बाँड, मोठ्या कंपनीने जारी केलेले डिबेंचर, कमर्शियल पेपर आणि बँकांनी जारी केलेले सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट (CDs) यासारखी रोखे बाजारातील साधने ह्यांचा समावेश होतो.
डेब्ट फंड्सची वर्गवारी खालीलप्रमाणे केली जाते:
- ओव्हरनाइट फंड – हे 1-दिवसाची मुदतपूर्ती असणाऱ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात.
- लिक्विड फंड्स - हे 90 दिवसांमध्ये मुदतपूर्ती होणाऱ्या मनी मार्केट इंस्ट्रूमेंटमध्ये गुंतवणूक करतात फ्लोटिंग रेट फंड्स - हे फ्लोटिंग रेट म्हणजे बदलत असणाऱ्या दराच्या डेब्ट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात
- अल्ट्रा-शॉर्ट कालावधीचे फंड्स – हे 3-6 महिन्यांमध्ये मुदतपूर्ती होणाऱ्या डेब्ट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात
- लॊ ड्युरेशन(अगदी कमी कालावधीचे) फंड्स - हे 6-12 महिन्यांमध्ये मुदतपूर्ती होणाऱ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात
- मनी मार्केट फंड्स – हे 1 वर्षापर्यंत मुदतपूर्ती असणाऱ्या मनी मार्केट इंस्ट्रूमेंटमध्ये गुंतवणूक करतात
- शॉर्ट ड्युरेशन(अल्प कालावधीचे) फंड्स – हे 1-3 वर्षे मुद्तपूर्ती असणाऱ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात
- मध्यम कालावधीचे फंड – हे 3-4 वर्षे मुदतपूर्ती असणाऱ्या डेब्ट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात
- मध्यम ते दिर्घ कालावधीचे फंड्स - हे 4-7 वर्षे मुदतपूर्ती असणाऱ्या डेब्ट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात
- दीर्घ कालावधीचे फंड्स – हे दीर्घकालीन मुदतपूर्ती असणाऱ्या डेब्टमध्ये गुंतवणूक करतात (7 वर्षांपेक्षा अधिक)
- कॉर्पोरेट बाँड फंड्स – हे कॉर्पोरेट बाँड्समध्ये गुंतवणूक करतात
- बँकिंग आणि पीएसयू फंड्स – हे बँका, पीएसयू, पीएफआय यांच्या डेब्टमध्ये गुंतवणूक करतात
- गिल्ट फंड्स – हे निरनिराळी मुदतपूर्ती असणाऱ्या सरकारी बाँड्समध्ये गुंतवणूक करतात
- 10 वर्षे स्थिर कालावधीचे गिल्ट फंड्स – हे सरकारच्या 10 वर्षांच्या मुदतपूर्तीच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात
- डायनामिक फंड्स – हे निरनिराळी मुदतपूर्ती असणाऱ्या डेब्ट फंड सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात
- क्रेडिट रिस्क फंड्स – हे सर्वात अधिक रेटिंगपेक्षा कमी रेटिंगच्या कॉर्पोरेट बाँड्समध्ये गुंतवणूक करतात
460