डेब्ट फंड्स बद्दल अधिक जाणून घेऊया.

Video

इक्विटी म्युच्युअल फंड्स हे स्टॉक्स खरेदी करतात तर डेब्ट फंड्स हे त्यांच्या पोर्टफोलिओ साठी बॉन्ड्ससारख्या डेब्ट फंड सिक्युरीटीज खरेदी करतात. ऊर्जा क्षेत्र, बँका, हाऊसिंग फायनान्स आणि सरकार ह्यासारख्या कॉर्पोरेट्सकडून बाँड्स सारख्या सिक्युरिटीज म्हणजे बॉन्ड्स दिले जातात. नवीन प्रोजेक्टसाठी कर्ज घेण्याऐवजी ते लोकांकडून (गुंतवणूकदार) पैसे घेतात आणि त्याबदल्यात बॉन्ड्स देऊन त्यावर स्थिर व्याजदर देऊ करतात. ज्यांनी बॉन्ड्स खरेदी केले आहेत त्यांना ठराविक मुदतीसाठी स्थिर व्याज देणे बंधनकारक आहे.

जेव्हा गुंतवणुकदार ठराविक मुदतीचे बॉन्ड्स खरेदी करतात तेव्हा ते त्यांचे पैसे बॉन्ड्स जारी करणा-याला (समजा एबीसी पॉवर लि.) काही वर्षांसाठी कर्ज म्हणून देत असतात. एबीसी ह्या काळात गुंतवणुकदारांना त्यांनी बॉन्ड्समध्ये गुंतवलेल्या पैशासाठी (=एबीसीला दिलेले पैसे) नियमित काळासाठी व्याज देण्यास वचनबद्ध असते. एबीसी ही कर्जदार असते जसा, गृहकर्ज घेतलेला एखादा ग्राहक असतो. गुंतवणुकदार (आपला म्युच्युअल फंड आपले पैसे गुंतवतो) हा एबीसीला कर्ज देणारा असतो, ज्याप्रमाणे बँक गृहकर्ज एखाद्या ग्राहकाला देते.

डेब्ट फंड आपले पैसे बॉन्ड्सच्या आणि इतर डेब्ट फंड सिक्युरिटीज मध्ये गुंतवतो.

460