हो, म्युच्युअल फंड्स “मार्फत” आणि म्युच्युअल फ़ंड्स “मध्ये” नाही. ह्यात काय फरक आहे?
आपण कधी ना कधी स्टॉक्स आणि बॉन्ड्स खरेदी विक्री केलेले असतात पण आपल्या गुंतवणुकीच्या व्यवस्थापनासाठी म्युच्युअल फंड्सची मदत घेणे ही जास्त चांगली कल्पना ठरु शकते.
जेव्हा आपण म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक करतो, तेव्हा प्रोफेशनल मेनेजर्सच्या साहाय्याने स्टॉक्स, बाँड्स मध्ये किंवा इतर गुंतवणूकीमध्ये अप्रत्यक्षरित्या गुंतवणूक करत असतो. ही कामे आपण स्वतः करण्याऐवजी, आपण थोडीफार फी देऊन फंड व्यवस्थापन कंपनीच्या सेवेचा लाभ घेतो. ह्या सेवांमध्ये फक्त ज्यात फंड व्यवस्थापक तज्ञ आहे त्या संशोधन, विविध गुंतवणुकींची निवड आणि खरेदी-विक्री समावेश नसतो तर गुंतवणुकीच्या संदर्भातील हिशोब आणि कार्यालयीन कामकाजाच्या गोष्टींचाही समावेश असतो, जे आपल्यापैकी बरेच जण करु इच्छित नाहीत.