म्युच्युअल फंडमध्ये गुंतणूक करून माझी बचत जोखमीत घालणे योग्य आहे का?

म्युच्युअल फंडमध्ये गुंतणूक करून माझी बचत जोखमीत घालणे योग्य आहे का?

जोखीम न घेताच चांगला परतावा मिळवण्याची इच्छा सर्वांचीच असते. पण आपला पैसा गुंतवल्या शिवाय चांगला परतावा मिळणे शक्य आहे का? जर आपण आपली बचत गुंतवीत आहात, तर आपल्याला चलनवाढीपेक्षा अधिक परतावा मिळवण्यासाठी जोखीम घेतलाच पाहिजे. (चलनवाढ आपल्या बचतवर कसा प्रभाव टाकते याच्या माहितीसाठी हा लेख वाचा) ही गुंतवणूक आपल्या काही भावी उद्दिष्टांसाठी असू शकते, जसे मुलांचे शिक्षण, नवीन घर किंवा निवृत्ती. तरीही, आपल्याला काळजी वाटू शकते की आपण आपल्या कष्टाचा पैसा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवून जोखीम पत्करता आहात, आपण याला अगदी सुरक्षित एफडीमध्ये सुद्धा गुंतवू शकताल असतात.

अशी शंका येणे साहजिक आहे.म्युच्युअल फंडमध्ये जोखीम असतो हे सर्वांना माहीत आहे. एफडी प्रमाणे त्यांत परताव्याची गॅरंटी नसते. पण ते क्रिकेटच्या खेळाप्रमाणे असतात. जेव्हा भारताची टीम मॅचसाठी येते, तेव्हा आपल्याला माहीत नसते की ते जिंकतील किंवा नाही. मॅच हरण्याचा मोठा जोखीम तर असतोच, तरीही जिंकण्याची तेवढीच मोठी संधी सुद्धा असते. जर टीमने मॅच खेळण्याचा जोखीम पत्करलाच नाही, तर त्यांना यश मिळणारच नाही.

म्युच्युअल फंडचे तसेच आहे. गुंतवणूक करून आपण आपले भांडवल जोखमीत टाकणारच नाही, तर आपल्याला म्युच्युअल फंडच्या दुसऱ्या पैलूचा अनुभव कधीच येणार नाही, म्हणजेच एफडी, सोने, स्थावर मालमत्ता यांच्या पेक्षा चलनवाढीवर अधिक मात करणारा परतावा मिळवून देण्याची क्षमता.

454

म्युच्युअल फंड सही आहे?