म्युच्युअल फंडमध्ये एकदा गुंतवणूक केल्या नंतर पैसे काढता येणार नाहीत अशी आपल्याला काळजी वाटते का? खरं तर, आपण आपल्या गरजेप्रमाणे पाहिजे तेव्हा पैसे काढू शकता. अनेक गुंतवणूकदारांना वाटते की यात पैसे अडकून पडतात कारण ते काढण्यासाठी फार द्राविडी प्राणयाम करावे लागतात. वास्तविकता अशी आहे की म्युच्युअल फंडमधून पैसे काढणे आपल्या बँकेतून पैसे काढण्यासारखेच सोपे असू शकते. आपल्याला फक्त आपल्या म्युच्युअल फंड खात्यामध्ये लॉगइन करून “Redeem” या बटणावर क्लिक करावे लागते.
आपण आपल्या वितरकाच्या माध्यमाने अर्ज दाखल करू शकता किंवा भरपाईचा अर्ज देण्यासाठी आपल्या म्युच्युअल फंडच्या ऑफिसला भेट देऊ शकता. आपण ऑनलाइन अर्ज केला असेल किंवा फॉर्म भरून दिलेला असेल अशा दोन्ही परिस्थितींमध्ये, आपण गुंतवणूक केलेल्या स्कीमवर अवलंबून, आपले पैसे आपल्या नोंदणी केलेल्या बँक खात्यामध्ये 3-4 कार्य दिवसांत जमा होतात. काही ओव्हरनाइट किंवा लिक्विड फंड तर आपल्याला त्याच दिवशीसुद्धा पैसे
अधिक वाचा