ईएसजी फंडांबद्दल आवश्यक माहिती तुम्हाला येथे मिळेल

ईएसजी फंडांबद्दल आवश्यक माहिती तुम्हाला येथे मिळेल zoom-icon

ईएसजी (ESG) म्हणजे पर्यावरण (एनवायरनमेंटल), सामाजिक (सोशल) आणि प्रशासन (गव्हर्नन्स). ईएसजी फंडच्या पोर्टफोलिओमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय कामगिरीसाठी मूल्यांकन केलेल्या कंपन्यांचे शेअर्स आणि बाँड्स असतात. ही गुंतवणूक निवडून, तुम्ही निश्चित वाढ आणि जबाबदार व्यवसाय सक्रियपणे पुढे चालवण्यास प्रोत्साहन देता.

ESG ची तपशीलवार समज

पर्यावरण (ई): कंपनीचा पर्यावरणावर होणाऱ्या प्रभावासोबत कार्बन उत्सर्जन, कचरा विल्हेवाट पद्धती आणि पर्यावरणास अनुकूल ऊर्जा स्त्रोतांचा वापर यांवर ‘ई’ लक्ष केंद्रित करते.

सामाजिक (एस): कंपनी आपल्या कर्मचार्‍यांशी लैंगिक समानता, कल्याणकारी व्यवस्था आणि सामाजिक हेतू लक्षात घेऊन कसे समाजात योगदान देते आणि वागते याचे 'एस' परीक्षण करते.

प्रशासन (जी): कंपनीमधील प्रशासनाचे मूल्यमापन तसेच, नियामक अनुपालन, व्हिसल-ब्लोअर धोरणे आणि तक्रारीच्या निवारणाचे काम ‘जी’ करते.

वरील क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या कंपन्यांमध्ये ईएसजी फंड गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात आणि खराब रेकॉर्ड असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे टाळतात. ईएसजी म्युच्युअल फंड हे गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीच्या पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी ईएसजी रेटिंगचा वापर करतात. या रेटिंगची गणना तृतीय-पक्ष रेटिंग एजन्सीने सार्वजनिक केलेल्या माहितीच्या आधारावर होते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक त्यांच्या मूल्यांनुसार संरेखित (नियंत्रित) करण्यात मदत मिळते.

ईएसजी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुक करण्याचे फायदे
1. मूल्यांचे व्यवस्थापन:
तुमच्या वैयक्तिक मूल्यांना समर्थन देणाऱ्या तसेच सकारात्मक बदलांना मदत करणाऱ्या आणि ईएसजी घटकांना प्राधान्य देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
2. दीर्घकालीन कामगिरी: ईएसजी मूल्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कंपन्या शाश्वत वचनबद्धता आणि जोखीम व्यवस्थापनाचा फायदा घेऊन दीर्घकाळात चांगली कामगिरी करतात.
3. कमी जोखीम: खराब ईएसजी असणाऱ्या कंपन्यांना वगळून/सोडून, ईएसजी म्युच्युअल फंड पर्यावरणीय संकटे आणि प्रशासनीय मुद्दे इत्यादींसारख्या जोखमींचे व्यवस्थापन करण्यास हातभार लावतात.

अस्वीकरण
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

284