म्युच्युअल फंडातील टोटल रिटर्न इंडेक्स (टीआरआय) म्हणजे काय?

म्युच्युअल फंडातील टोटल रिटर्न इंडेक्स (टीआरआय) म्हणजे काय? zoom-icon

इक्विटी निर्देशांकांचे मूल्यमापन करण्यासाठी एकूण परतावा निर्देशांक (टोटल रिटर्न इंडेक्स - टीआरआय) महत्त्वाची भूमिका बजावतो. 

निर्देशांकाचा एकूण परतावा प्रकारात (टीआरआय), भांडवली नफ्या व्यतिरिक्त निर्देशांक तयार करताना वापरल्या जाणाऱ्या घटकांमधील सर्व लाभांश/व्याज पेमेंट्स विचारात घेतली जातात. त्यामुळे म्युच्युअल फंड योजनांच्या कामगिरीची तुलना करण्यासाठी बेंचमार्क म्हणून टीआरआय हा अधिक योग्य आहे.

टीआरआयची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

सेबीचा आदेश: 2018 मध्ये सेबीने म्युच्युअल फंडाच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी टीआरआयचा वापर बंधनकारक केला. आता म्युच्युअल फंडांना किंमत परतावा निर्देशांक (आधीची पद्धत) ऐवजी एकूण परतावा निर्देशांकाच्या आधारे त्यांची कामगिरी जाहीर करावी लागते, तर आधीच्या पद्धतीत केवळ भांडवलाच्या वाढीचा विचार केला जात होता. याच्या अनुपालनामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास तर वाढतोच, शिवाय उद्योगाचे मानदंडही कायम राखले जातात.
लाभांशांचा समावेश: या उत्पन्नात स्टॉकचे लाभांश, बाँड्सवरील व्याज आणि बेंचमार्क निर्देशांकामधील इतर उत्पन्न स्रोतांचा समावेश केला जातो. 
पुनर्गुंतवणूक: टीआरआयमध्ये असे गृहीत धरले जाते की लाभांशांसारख्या उत्पन्नाची निर्देशांकात पुनर्गुंतवणूक केली जाते. 
गुंतवणूकदारासाठी पारदर्शकता: यामुळे फंडाच्या कामगिरीचा वास्तविक आणि पारदर्शक दृष्टिकोन मिळतो. एखाद्या कालावधीत योजनेच्या वाढीचे आणि कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी हे मार्गदर्शक संदर्भ म्हणून कार्य करते.
दीर्घकालीन उद्दिष्टे: दीर्घ कालावधीसाठी फंडाचे मूल्यमापन करण्यासाठी टीआरआय आदर्श आहे.

अस्वीकरण

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.
 

285