म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ सुरुवातीपासून कसा तयार कराल?

म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ सुरुवातीपासून कसा तयार कराल? zoom-icon

म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा सोयीस्कर पर्याय आहे, कारण ते ॲसेट वर्ग, जोखीम, गुंतवणुकीची रक्कम आणि लिक्विडिटी या बाबतीत विविध पर्याय ऑफर करतात. परंतु, नवख्या व्यक्तीसाठी म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी पहिले पाऊल टाकणे आव्हानात्मक असू शकते. काही मूलभूत मार्गदर्शक तत्त्वांसह तुम्ही तुमचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ तयार करू शकता. 

तुमचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ तयार करण्याचे क्रमवार मार्गदर्शक:

  • तुमची जोखीम सहनशीलता समजून घ्या: म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना तुम्ही कितपत जोखीम स्वीकारण्यास तयार आहात याची पातळी म्हणजे तुमची जोखीम सहनशीलता. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीसाठी किती जोखीम घेऊ शकता हे ठरवल्यावर तुम्ही तुमच्यासाठी योग्य असलेल्या फंडांच्या प्रकाराबाबत निर्णय घेऊ शकता.  उदाहरणार्थ, तुमची जोखीम सहनशीलता अधिक असल्यास तुम्ही इक्विटीमध्ये जास्तीत जास्त पैसे गुंतवू शकता, या उलट जर तुम्ही जोखीम टाळणारे गुंतवणूकदार असाल तर डेट फंड तुमच्यासाठी अधिक योग्य आहेत. 
  • उद्दिष्टे निश्चित करणे: उद्दिष्टे हा एक महत्त्वपूर्ण पैलू आहे कारण भविष्यातील इतर सर्व निर्णय त्यांच्याशी निगडित असतील. उद्दिष्टांच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणुकीची रक्कम आणि सर्वसाधारण कालावधी तसेच गुंतवणुकीचे इतर अनेक घटक ठरवू शकता. शिवाय, तुमच्या उद्दिष्टाशी जुळवल्याने तुम्ही प्रत्येक म्युच्युअल फंडाला एका विशिष्ट आर्थिक उद्दिष्टाशी जोडू शकता. 
  • तुमचे फंड निवडा: तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि तुमची जोखीम स्वीकारण्याची क्षमता माहीत झाल्यानंतर तुम्ही या मर्यादेत बसणारे फंड निवडू शकता. 
  • ॲसेट वाटप: ॲसेट वाटप किंवा विविध ॲसेट वर्गांमध्ये वैविध्यपूर्ण गुंतवणूक हा एक आवश्यक घटक आहे जो तुमचा पोर्टफोलिओ संतुलित ठेवतो. संतुलित पोर्टफोलिओ म्हणजे ज्यात इक्विटी फंड, डेट फंड, हायब्रीड फंड आणि बऱ्याच प्रकारांमध्ये गुंतवणूक विखुरलेली असते. हे महत्त्वाचे आहे कारण विविध ॲसेट वर्ग बाजाराच्या परिस्थितीनुसार भिन्न कामगिरी करतात आणि यामुळे जोखमीतील वैविध्य सुनिश्चित होते.
  • लक्ष ठेवा, आढावा घ्या आणि पुनर्संतुलन साधा: शेवटची पायरी म्हणजे तुमच्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवणे, आढावा घेणे आणि पुनर्संतुलन साधणे; यामध्ये, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे आणि विविधीकरण, गुंतवणुकीची वारंवारता, ॲसेट्सचे पुनर्संतुलन आणि इतर बरेच पैलू निश्चित करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडांच्या कामगिरीचा आढावा घेऊ शकता आणि जर ते दीर्घकाळ खराब कामगिरी करत असतील तर तुम्ही चांगल्या फंडांवर स्विच करू शकता. 

 

अस्वीकरण

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

285

म्युच्युअल फंड सही आहे?