सेवानिवृत्ती नियोजन कॅल्क्युलेटर
तुमच्या रिटायरमेंट निधीच्या भविष्यातील शिल्लक रकमेचा अंदाज लावा.
वर्षे | |
वर्षे | |
वर्षे | |
₹ | |
% | |
% | |
% | |
₹ | |
अस्वीकरण:
भूतकाळातील कामगिरी प्रमाणे भविष्यातील कामगिरी असेल किंवा नसेल आणि ती भविष्यातील परताव्याची हमी देत नाही.
कृपया नोंद घ्या की हे कॅल्क्युलेटर केवळ उदाहरणादाखल आहेत आणि ते प्रत्यक्ष परतावे दर्शवत नाहीत.
म्युचुअल फंड्सवर नियत मिळकतीचा दर(फिक्स्ड रेट ऑफ रिटर्न) मिळत नाही आणि मिळकतीच्या दराचे(रेट ऑफ रिटर्न) अनुमान लावणे अशक्य असते.
MFSH सेवानिवृत्ती नियोजन कॅल्क्युलेटर
प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीसाठी सेवानिवृत्तीचे नियोजन महत्त्वाचे असते. सेवानिवृत्ती योजना तयार करण्याची प्रक्रिया हि उत्पन्नाचे स्रोत ओळखणे, प्रभावी बचत योजना पूर्ण करणे, आवश्यक निधीचा अंदाज लावणे आणि तुमच्या उत्पन्नाचा काही भाग विविध मालमत्तेमध्ये गुंतवणे याभोवती फिरते.
तथापि, एक मजबूत सेवानिवृत्ती जीवनासाठी योग्य कॅल्क्युलेशन्स करणे आणि तुमच्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याचा अंदाज लावणे हा कठीण भाग आहे. सेवानिवृत्ती कॅल्क्युलेटर अश्या व्यक्तींसाठी उपयोगी पडू शकतो, ज्यांना सेवानिवृत्ती निधी आवश्यक आहे आणि ते मिळवण्यासाठी त्यांना किती बचत किंवा गुंतवणूक करावी लागेल हे समजून घ्यायचे आहे.
सेवानिवृत्ती नियोजन म्हणजे काय?
सेवानिवृत्ती नियोजन म्हणजे सेवानिवृत्तीसाठी योग्य आर्थिक तयारी. सेवानिवृत्तीचे नियोजन करताना, तुम्हाला महागाईचा विचार करणे, सेवानिवृत्तीनंतरच्या खर्चाचा अंदाज घेणे, सेवानिवृत्तीच्या कालावधीचा अंदाज घेणे, जोखमींचे मूल्यांकन करणे आणि अभ्यासपूर्ण गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
याशिवाय, जीवनाच्या वाढत्या अपेक्षेसोबत, तुम्ही तुमच्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर आर्थिकदृष्टया सुरक्षित असणे ही एक गरज बनली आहे. म्युच्युअल फंड सही है मधील सेवानिवृत्ती नियोजन कॅल्क्युलेटर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर आवश्यक असलेल्या निधीची रक्कम आणि सेवानिवृत्तीपूर्वी आणि सेवानिवृत्तीनंतरच्या गुंतवणुकीवर तुम्ही किती परतावा देऊ शकता याचे मूल्यांकन करण्यात मदत करू शकते.
MFSH रिटायरमेंट प्लॅनिंग कॅल्क्युलेटर म्हणजे काय?
MFSH रिटायरमेंट कॅल्क्युलेटर हे ऑनलाइन युटिलिटी टूल आहे जे तुम्हाला तुमच्या सेवानिवृत्तीनंतर किती पैसे लागतील हे दाखवते. तुम्हाला जमा करावयाच्या सेवानिवृत्ती निधीच्या आधारे तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन करण्यात हे तुम्हाला मदत करते.
ह्याची तुम्हाला दोन ठिकाणी मदत होऊ शकते आणि ते आहेत:
1. तुमची सध्याची जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला आवश्यक असलेले पैसे हे तुम्हाला दाखवते.
2. हे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवरील परताव्याचा अंदाज लावण्यास आणि तुमचा सेवानिवृत्ती निधी जमा करण्यासाठी तुम्ही कशी गुंतवणूक करावी हे समजून घेण्यासाठी मदत करू शकते.
सेवानिवृत्ती नियोजन कॅल्क्युलेटर कसे कार्य करते?
MFSH सेवानिवृत्ती कॅल्क्युलेटरमध्ये एक फॉर्म्युला बॉक्स आहे जेथे तुम्ही तुमचे वर्तमान वय, तुमचे सेवानिवृत्तीचे वय, अपेक्षित जीवन आणि सेवानिवृत्तीनंतर आवश्यक मासिक उत्पन्न प्रविष्ट करू शकता. तुम्हाला अंदाजे महागाई दर, गुंतवणुकीवरील अपेक्षित परतावा आणि तुमच्याकडे सध्या काही बचत असल्यास त्यांची निवड करावी लागेल.
हे तपशील प्रविष्ट केल्यावर, कॅल्क्युलेटर तुम्हाला सेवानिवृत्तीच्या वेळी आवश्यक असलेले वार्षिक उत्पन्न आणि ही रक्कम प्राप्त करण्यासाठी तुम्हाला किती मासिक बचत करावी लागेल हे सांगेल.
MFSH रिटायरमेंट प्लॅनिंग कॅल्क्युलेटर कसे वापरावे?
फक्त काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही हा कॅल्क्युलेटर वापरू शकता आणि त्या स्टेप्स खालील प्रमाणे:
स्टेप 1: तुमचे वर्तमान वय प्रविष्ट करा.
स्टेप 2: तुमचे इच्छित सेवानिवृत्तीचे वय प्रविष्ट करा.
स्टेप 3: तुमचे अपेक्षित जीवन निवडा.
स्टेप 4: तुमच्या सेवानिवृत्तीच्या वर्षांमध्ये तुम्हाला आवश्यक असलेले मासिक उत्पन्न प्रविष्ट करा.
स्टेप 5: देशातील अंदाजे महागाई दर प्रविष्ट करा.
स्टेप 6: निवृत्तीपूर्व गुंतवणुकीवर अपेक्षित असलेला परतावा प्रविष्ट करा.
स्टेप 7: निवृत्तीनंतरच्या गुंतवणुकीवर अपेक्षित असलेला परतावा प्रविष्ट करा.
स्टेप 8: सेवानिवृत्तीसाठी बाजूला ठेवलेली कोणतीही वर्तमान बचत किंवा गुंतवणूक इनपुट करा.
हे तपशील प्रदान केल्यावर, तुम्ही कॅल्क्युलेटर डिस्प्ले पाहू शकता:
- • सेवानिवृत्तीनंतर लागणारे वार्षिक उत्पन्न.
- • अतिरिक्त निधी जमा करणे आवश्यक आहे.
- • आवश्यक कॉर्पस/राशी जमा करण्यासाठी आवश्यक मासिक बचत.
MFSH रिटायरमेंट प्लॅनिंग कॅल्क्युलेटर वापरण्याचे फायदे
हे सेवानिवृत्ती कॅल्क्युलेटर वापरण्याचे प्राथमिक फायदे आहेत:
हे सेवानिवृत्तीसाठी बचत करण्यास मदत करते: सेवानिवृत्तीसाठी बचत 20 आणि 30 च्या दशकात लवकर सुरू करणे आवश्यक आहे. कॅल्क्युलेटर व्यक्तीला सुरुवातीपासूनच आवश्यक रक्कम सांगून बचत कशी करायची आणि गुंतवणूक कशी करायची आणि दिलेल्या मुदतीत ती कशी जमा करायची हे सुचवते.
सेवानिवृत्तीनंतर आवश्यक असलेली अंदाजे रक्कम जाणून घेण्यास मदत करते: तुम्हाला तुमच्या सेवानिवृत्तीसाठी नेमके किती पैसे लागतील याचा अंदाज लावणे कठीण आहे आणि हा कॅल्क्युलेटर हे काम सोपे करतो. या व्यतिरिक्त, हे तुम्हाला गुंतवणुकीची रक्कम किंवा बचत सांगते जी तुम्ही या वेळी करावी, जेणेकरून अंदाजे कॉर्पस रक्कम दिलेल्या मुदतीत जमा करता येईल.
हे सेवानिवृत्तीच्या अतिरिक्त खर्चाची योजना बनविण्यात मदत करते: तुमच्या सेवानिवृत्तीमध्ये अतिरिक्त खर्च होणार असल्यास, तुम्ही त्यांच्यासाठी आगाऊ योजना बनवू शकता आणि त्यांच्यासाठी तयार राहू शकता, कारण तुम्हाला सेवानिवृत्तीच्या जीवनात अपेक्षित असलेल्या खर्चांबद्दल आधीच माहिती असते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्र1. म्युच्युअल फंड सही है रिटायरमेंट कॅल्क्युलेटर काय आहे?
MFSH सेवानिवृत्ती कॅल्क्युलेटर हे एक उपयुक्त ऑनलाइन साधन आहे जे तुम्हाला तुमच्या सेवानिवृत्तीसाठी किती गुंतवणूक करायची आहे याची याचा अंदाज लावण्यास मदत करते.
प्र2. MFSH सेवानिवृत्ती कॅल्क्युलेटर कसे कार्य करते?
हे कॅल्क्युलेटर तुमच्या सेवानिवृत्तीनंतर आवश्यक रक्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला बॉक्स वापरते.
प्र3. सेवानिवृत्ती नियोजन कॅल्क्युलेटरमध्ये मला कोणते माहिती देणे आवश्यक आहे?
तुम्हाला तुमचे सध्याचे वय, अपेक्षित वय, सेवानिवृत्तीनंतर आवश्यक असलेले मासिक उत्पन्न, तुमचा अंदाजे परतावा दर आणि महागाई दर प्रदान करणे आवश्यक आहे.
प्र4. माझ्या सेवानिवृत्तीसाठी निधी जमा करण्यासाठी काही शिफारस केलेल्या गुंतवणूक पद्धती कोणत्या आहेत?
तुम्ही इक्विटी गुंतवणूक, म्युच्युअल फंड, बाँड्स, पीपीएफ, नॅशनल पेन्शन स्कीम आणि बरेच काही यांना प्राधान्य देऊ शकता.
प्र5. सेवानिवृत्ती नियोजन कॅल्क्युलेटर अचूक आहे का?
सेवानिवृत्ती कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेशन्ससाठी अचूक आहे. तथापि, विचारात घेण्यासारखे इतर अनेक घटक आहेत, जसे की तुमच्या गुंतवणुकीतील जोखीम, अनपेक्षित संकटकाळ आणि बरेच काही.