सामूहिक आणि संकलित गुंतवणूक ही अनेक पारंपारिक प्रकारांमध्ये जगभरात बऱ्याच काळापासून अस्तित्वात आहे. मॅसेच्युसेट्स इन्व्हेस्टर्स ट्रस्टच्या निर्मितीपासून म्युच्युअल फंड्स 1924 मध्ये अस्तित्वात आले हे आपल्या सर्वांना माहित आहे.
म्युच्युअल फंड्स उद्योगाचा विकास या तीन विस्तृत प्रवाहांसह झाला होता:
- व्यवस्थापना खालील अॅसेट मध्ये लक्षणीय विकास – अधिकाधिक गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड्सचा स्वीकार केला.
- कठोर नियमन ज्यामुळे गुंतवणूकदाराची सुरक्षितता आणि फंड व्यवस्थापन उद्योगाचे योग्य पर्यवेक्षण होण्याची खात्री झाली.
- वेगवेगळ्या ग्राहकांच्या गरजांसाठी अनुकूल असलेल्या अधिक नाविन्यपूर्ण उत्पादनांचा परिचय – जसे की, निवृत्तिसाठीचे दीर्घकालीन नियोजन ते अल्पकालीन रोकड व्यवस्थापन.
म्युच्युअल फंड्स भारतामध्ये 1963 मध्ये युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची (यूटीआय) स्थापना झाल्यापासून अस्तित्वात आहेत. यूटीआय हे भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांनी स्थापन केले होते. युनिट स्किम 64, ही ऑगस्ट 1964 मध्ये प्रस्तुत करण्यात आलेली पहिली म्युच्युअल फंड स्किम होती.
1987 मध्ये इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि संस्थांना म्युच्युअल फंड्स सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. 1993 मध्ये उदारीकरणाच्या लाटेवर, खाजगी क्षेत्र आणि विदेशी प्रायोजकांना म्युच्युअल फंड्स सुरू करण्याची परवानगी देण्यात आली.
यामुळे म्युच्युअल फंड्स उद्योगाने शीघ्रतेने आकार, कौशल्य आणि व्यापकता संपादित केली. 31 मार्च 2022 नुसार भारतामध्ये म्युच्युअल फंड्स मधील व्यवस्थापित मालमत्ता 37.7 लाख कोटीच्या वर आहे.