मी म्युचुअल फंडची निवड कशी करावी?

मी म्युचुअल फंडची निवड कशी करावी? zoom-icon

कल्पना करा की आपण एखाद्या ट्रॅव्हल एजंटला विचारले की, "प्रवासासाठी वाहनाची निवड कशी करावी?" एजंटचे उत्तर असेल, "आपल्याला कुठे जायचे आहे यावर ते अवलंबून आहे." जर मला 5 किलोमीटर लांब जायचे असेल, तर रिक्षेने जाणे उत्तम पर्याय ठरु शकेल, पण दिल्लीहून कोचीनला जायचे असेल, तर विमानाने जाणे अधिक योग्य ठरु शकेल. कमी अंतरासाठी विमान उपलब्ध नसेल आणि फार लांबच्या प्रवासासाठी रिक्षेने जाणे गैरसोयीचे आणि वेळखाऊ, माध्यम ठरू शकेल.

म्युच्युअल फंड्समध्ये सुद्धा पहिला प्रश्न हाच असायला हवा - आपल्या नेमक्या गरजा काय आहेत?

याची सुरुवात आपल्या आर्थिक उद्दीष्टांपासून आणि जोखीम पत्करण्याच्या इच्छेपासून होते.

आपल्याला सर्वात आधी आपली आर्थिक उद्दीष्ट्ये समजून घ्यावी लागतील. काही म्युच्युअल फंड स्किम्स अल्पकालीन गरजा किंवा उद्दीष्टांसाठी योग्य असतात, तर काही दीर्घकालीन उद्दीष्टांसाठी योग्य असू शकतात.

आणि मग नंतर येते आपली जोखीम पत्करण्याची इच्छा. निरनिराळ्या लोकांची जोखीम पत्करण्याची इच्छा निराळी असते. नवरा-बायकोंचे आर्थिक व्यवहार संयुक्तरित्या असले तरीही त्यांच्या प्रत्येकाच्या जोखमीचे स्वरूप वेगळे असू शकते. काहीजण अधिक जोखीम असलेल्या उत्पादनांमध्ये आरामदायीअसतात, तर काहींना ते मुळीच आवडत नाही.

आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेचे योग्य मूल्यमापन करण्यासाठी आपण गुंतवणूक सल्लागार अथवा वित्त तज्ञांची मदत घेऊ शकता.

454
454

म्युच्युअल फंड सही आहे?