म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्यात काय जोखीम आहे?

म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्यात काय जोखीम आहे?

आपण असे ऐकतो की: "म्युच्युअल फंड्समधील गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन असते." कधी विचार केला आहे का, की या जोखमी कुठल्या?

डावीकडील चित्रामध्ये विविध प्रकारच्या जोखमी दाखवल्या आहेत.

सर्वच जोखमींचा प्रभाव सर्व फंड स्किम्सवर होत नाही. स्किम माहिती दस्तऐवज (SID) मध्ये माहिती दिलेली असते की आपण निवडलेल्या स्किमवर लागू पडणाऱ्या जोखमी कुठल्या आहेत.

तर फंड व्यवस्थापन टीम या जोखमींचे व्यवस्थापन कसे करते?

म्युच्युअल फंडने कुठल्या प्रकारच्या गुंतवणुकींमध्ये गुंतवणूक केली आहे हे त्यावर अवलंबून असते. काही सिक्युरिटीज काही विविक्षित जोखमींच्या अधीन असतात तर इतर सिक्युरिटीज इतर जोखमींच्या अधीन असतात.

व्यावसायिक मदत, विभाजन आणि सेबीचे नियम हे म्युच्युअल फंड्समधील जोखमींना कमी करण्याचे काम करतात.

शेवटी, सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो अनेक गुंतवणूकदार विचारतात तो असा की: म्युच्युअल फंड कंपनी माझे पैसे घेऊन पळून जाऊ शकते का? म्युच्युअल फंड्सच्या संरचनेमुळे, तसेच भक्कम नियमनामुळे असे होण्याची कोणतीही शक्यता नाही.

म्युच्युअल फंड सही आहे?