जेव्हा आपण गुंतवणुकीबद्दल विचार करतो, तेव्हा आपल्याला किती परतावा मिळेल याबद्दल प्रश्न विचारणे अगदी साहजिक आहे. पारंपरिक बचत योजना आणि मुदत ठेवींबद्दल या प्रश्नाचे उत्तर जरी सोपे असले, तरीही म्युच्युअल फंडच्या बाबतीत ते तसे नाही. पारंपरिक बचतीच्या साधनांवर परताव्याची गॅरंटी असते आणि त्याबद्दल आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आपली बचत अशा प्रकारच्या साधनांमध्ये गुंतवण्याचा निर्णय बऱ्याच अंशी सोपा असतो. पण म्युच्युअल फंडच्या बाबतीत शेकडो स्कीम असल्यामुळे हे काम फारच गुंतागुंतीचे वाटू शकते कारण त्या सर्व स्कीमबद्दल माहिती असणे शक्यच नसते.
अशा वेळेला फंडची कामगिरी दर्शवणारा डॅशबोर्ड फार कामास येतो. फंडची कामगिरी दर्शवणारा डॅशबोर्ड म्हणजे सर्व फंडचे प्रगती पुस्तकच असते. आपण त्यांच्या बेंचमार्क प्रमाणे त्यांची जुनी कामगिरी, ताजी एनएव्ही आणि दैनिक व्यवस्थापित मालमत्ता हे सर्व एकाच ठिकाणी पाहू शकता. अशा डॅशबोर्डमुळे आपण कामगिरीची तुलना अगदी सोप्या रीतिने करू शकता, पण कुठलाही निर्णय घेताना फक्त एवढ्यानेच काम भागत नाही. आपल्या गुंतवणुकीसाठी योग्य फंडची निवड करताना आपल्याला इतर अनेक गोष्टी जसे फंडचा प्रकार, फंडचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट, जोखमीचा स्तर आणि आपल्या उद्दिष्टांप्रमाणे आणि जोखीम पत्करण्याच्या क्षमतेप्रमाणे उपयुक्तता या सर्वांचा विचार करावा लागतो.
तरीही, जर आपल्याला निरनिराळ्या फंडच्या कामगिरीची तुलना करायची असेल, तर आपण www.mutualfundssahihai.com इथे भेट दिल्यावर 'म्युच्युअल फंड स्कीमची कामगिरी जाणून घ्या’ यावर क्लिक करून एकाच ठिकाणी सर्व फंडची कामगिरी पाहू शकता.