आपण आपल्या मित्राला स्टार्ट-अप सुरू करण्यासाठी 8% दराने 5 लाख रुपये कर्ज दिले आह. (7% बँक दरापेक्षा अधिक). आपण जरी त्याला ब-याच वर्षापासून ओळखत असलात, तरीही ह्यामध्ये आपल्याला जोखीम असतेच की त्याने जर वेळेवर पैसे परत केले नाहीत, किंवा परत करूच शकला नाही. तसेच, बँक दर 8.5% पर्यंत वाढले, आणि तरीही आपली गुंतवणूक 8% वरच अडकून राहील.
तसेच, डेब्ट फंड्स आपले पैसे बाँड आणि मनी मार्केट इंस्ट्रूमेंट यासारख्या व्याज-दरावरील सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात. ह्या सिक्युरिटीज या फंड्सना नियमित व्याज देण्यासाठी वचनबद्ध असतात. म्हणूनच ज्याप्रमाणे आपण मित्रांना पैसे कर्ज म्हणून देता तेव्हा जोखीम असते, त्याप्रमाणेच डेब्ट फंड्ससाठी तीन प्रमुख जोखमी असतात.
- प्रथम, हे फंड्स व्याज देणाऱ्या सिक्युरीटीजमध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे, त्यांच्या एनएव्ही बदलत्या व्याजदराप्रमाणे बदलत राहतात (व्याज दरातील जोखीम). व्याजाचे दर वाढल्यावर या फंड्सच्या किंमती कमी होतात, तसेच जर दर कमी झाला तर