फिक्स्ड इन्कम फंड म्हणजे अशा म्युच्युअल फंड योजना ज्यांच्या मूलभूत ॲसेट्स फिक्स्ड-इनकम सिक्युरिटीज असतात, जसे की सरकारी सिक्युरिटीज, डिबेंचर्स, कॉर्पोरेट बाँड्स आणि इतर मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स. या फंडांना ढोबळमानाने डेट फंड असेही म्हणतात. कॉर्पोरेट बाँड फंड, डायनॅमिक बाँड फंड, बँकिंग आणि पीएसयू डेट फंड, गिल्ट फंड, लिक्विड फंड इत्यादींचा फिक्स्ड इन्कम फंडांच्या श्रेणीत समावेश होतो.
फिक्स्ड इनकम म्युच्युअल फंडाची वैशिष्ट्ये सामान्यतः ही असतात:
फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक: बाँड्स आणि इतर फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करून परतावा मिळविणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. म्हणजेच हे फंड बाँड्स खरेदी करतात आणि गुंतवणुकीवर व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न मिळवतात.
बाजारातील कमी अस्थिरता: फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजमध्ये अस्थिरता कमी असते आणि बाजारातील विविध चढ-उतारांचा त्यांच्यावर कमी परिणाम होतो.
वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ: डेट फंड हे डेट आणि मनी मार्केट या दोन्ही साधनांमध्ये (जसे की कमर्शियल पेपर्स, ट्रेझरी बिले आणि इतर) गुंतवणूक करतात. यामुळे
अधिक वाचा