म्युच्युअल फंडबद्दल एकूण जागरूकता वाढते आहे आणि गॅरंटी असलेले सेव्हिंगच्या प्रॉडक्टवर व्याजाचे दर कमी होत आहेत, त्यामुळे बँकेतील मुदत ठेवी, PPF, NSC या सारखे पारंपारिक प्रॉडक्टची सवय असलेले कमी जोखीम पत्करणारे गुंतवणूकदार आता डेब्ट फंडकडे वळत आहेत. अशा गुंतवणूकदारांना इक्विटी फंडच्या तुलनेत डेब्ट फंडमध्ये चढ-उतार कमी आहे असे वाटते आणि मुदत ठेवी, PPF, NSC सारखे पारंपारिक प्रॉडक्टपेक्षा अधिक कर-कार्यक्षम असतात आणि यांत अधिक परतावा मिळण्याची शक्यता सुद्धा असते. तरीही, गुंतवणूकदारांना डिफॉल्ट रिस्क म्हणजे मुद्दल गमावण्याची, व्याज गमावण्याची आणि व्याज दरांमध्ये चढ-उतार होण्याची जोखीम यांना सामोरे जावेच लागते.
टार्गेट मॅच्युरिटी फंड (TMFs) गुंतवणूकदारांना त्यांचे पोर्टफोलिओ फंडाच्या मॅच्युरिटी तारखेशी संरेखित(अलाइन) करून डेट फंडाशी संबंधित जोखीम अधिक चांगल्या प्रकारे नेव्हिगेट करण्यात मदत करतात. हे असे निष्क्रिय डेब्ट फंड असतात जे त्यातील मूलभूत बाँड इंडेक्सला ट्रॅक करतात. त्यामुळे, अशा फंडच्या पोर्टफोलिओमध्ये तेच बाँड असतात
अधिक वाचा