आपल्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी फंड दोन टप्प्यामध्ये निवडता येतो. पहिला टप्पा आपल्या विषयी आहे आणि ज्यामध्ये इक्विटी म्युच्युअल फंडची गरज आहे का, कुठल्या आर्थिक उद्दिष्टासाठी आहे आणि त्यासाठी किती कालावधी लागणार आहे, इक्विटी फंड गुंतवणूक कुठल्या प्रकारची असणार आहे आणि जोखीम पत्करण्याची आपली मर्यादा किती हे सर्व आधी ठरवले जाते. या सर्व बाबी ठरवल्यानंतर, पुढील पाऊल म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या फंड्सपैकी योग्य फंड निवडणे.
अशा प्रकारे दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्व फंड्सपैकी योग्य फंड निवडण्यासाठी थोडी आकडेवारी पहावी लागते आणि त्यासाठी फंड्सची माहिती काढून जोखमीच्या घटकांचे विश्लेषण केले जाते. फंडचा पोर्टफोलिओ, फंड किती जुना आहे, फंड व्यवस्थापक, खर्चाचे प्रमाण, फंडचा बेंचमार्क आणि दीर्घ कालावधीमध्ये फंडने बेंचमार्कच्या अनुषंगाने कशी कामगिरी केली आहे हे सर्व पहाणे गरजेचे असते.
पोर्टफोलिओचा आढावा घेताना याकडे लक्ष द्या की सेक्टर आणि स्टॉकची निवड या बाबतीत त्यात कितीसे डायव्हर्सिफिकेशन
अधिक वाचा