लॉक-इन कालावधी म्हणजे काय?

लॉक-इन कालावधी म्हणजे काय? zoom-icon

काही प्रकारचे म्युच्युअल फंड तुमच्या गुंतवणुकीवर ‘लॉक-इन कालावधी’ लागू करतात. यामध्ये इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस), डेट फंडांमधील फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन (एफएमपी) आणि क्लोज्ड एंडेड म्युच्युअल फंडांचा समावेश आहे. लॉक-इन कालावधी म्हणजे असा किमान कालावधी ज्यामध्ये गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक ठेवणे आवश्यक असते. त्या कालावधीत गुंतवणूकदार म्युच्युअल फंड युनिट्स रिडीम किंवा विक्री करू शकत नाहीत.  

म्युच्युअल फंड स्कीमच्या प्रकारानुसार लॉक-इन कालावधी बदलू शकतो. उदाहरणार्थ, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) हा एक कर वाचवणारा म्युच्युअल फंड आहे ज्याचा लॉक-इन कालावधी तीन वर्षांचा आहे. याचा अर्थ तुम्ही गुंतवणुकीच्या तारखेपासून तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वी त्यांचे युनिट्स विकू किंवा रिडीम करू शकत नाही. त्याचप्रमाणे, काही क्लोज्ड-एंडेड म्युच्युअल फंडांचा लॉक-इन कालावधी स्कीमच्या ऑफर डॉक्युमेंटमध्ये नमूद केलेला असू शकतो. याशिवाय तीन वर्षांहून अधिक काळ मालकीच्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा लाँग टर्म कॅपिटल गेन (दीर्घकालीन भांडवली नफा - एलटीसीजी) म्हणून

अधिक वाचा