मनी मार्केट फंड्स हे एक प्रकारचे म्युचूअल फंड असतात जे प्रामुख्याने एक वर्षाच्या आत परिपक्व होणार्या मनी मार्केट साधनांमध्ये गुंतवणूक करतात. मनी मार्केट म्हणजे अतिशय कमी कालावधीच्या निश्चित-उत्पन्नाच्या साधनांबाबत व्यवहार करणारा वित्तीय बाजार. मनी मार्केट फंड्समधील विशिष्ट भागीदार हे बँका, संस्थात्मक गुंतवणूकदार, कॉर्पोरेशन्स, इतर वित्तीय संस्था, आणि अधिक संस्था देखील असतात.
मनी मार्केट फंडमध्ये विशेषकरून काही वैशिष्ट्ये दिसून येतात जसे की कमी गुंतवणूक कालावधी, उच्च तरलता, कमी व्याजदर, आणि सापेक्षतेने कमी उत्पन्न.
मनी मार्केट फंड्स हे 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक करत असल्यामुळे, उत्तम परतावे आणि जोखीम नियंत्रणात ठेवण्यासाठी कालावधी बदलत असतात.
जास्तकरून, हे फंड्स इतर कोणत्याही म्युचूअल फंड्सप्रमाणेच कार्य करतात, मात्र त्यांची रचना अशाप्रकारे करण्यात आली आहे ज्याद्वारे त्यांची जोखीम नियंत्रणात ठेवतानाच देयकाच्या कालावधीमध्ये बदल करताना फंड व्यवस्थापकांना उच्च परतावे प्राप्त करून देण्याची क्षमता प्रदान करतात.
मनी मार्केट फंडची प्रमुख वैशिष्ट्ये
अधिक वाचा