जेव्हा आपण शहरातून वाहन चालवत असता, तेव्हा काही वेळा आपल्याला रस्ता रिकामा मिळतो आणि आपण ताशी 80 किलोमीटरच्या वेगाने वाहन चालवू शकता, तसेच इतर वेळी ट्रॅफिक किंवा स्पीड ब्रेकर मुळे आपल्याला वेग कमी करून ताशी 20 किलोमीटर पर्यंतसुद्धा आणावा लागतो. त्यामुळे, आपण किती वेळा वेग कमी केला किंवा वाढवला त्यावर अवलंबून आपला सरासरी वेग ताशी 45 किंवा 55 किलोमीटर भरतो.
फार अधिक नाही किंवा फार कमी सुद्धा नाही अशा शहरातून वाहन चालवण्याच्या आपल्या सरासरी वेगाप्रमाणेच, SIP मार्गाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्याने बाजारातील चढ-उतारांना सामोरे जाताना आपल्याला त्रास होत नाही. आपण सर्वांनाच माहीत आहे की बाजाराचे टायमिंग ठरवता येत नाही. म्हणूनच, कुठल्याही गुंतवणूकदारासाठी याची माहिती ठेवणे शक्य नाही की त्यांना गुंतवणूक करण्यासाठी/ गुंतवणुकीतून पैसा काढून घेण्यासाठी बाजाराच्या चढ-उताराची सर्वात योग्य वेळ कुठली. अशा परिस्थितीमध्ये, शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना बाजारातील चढ-उतारांमुळे होणाऱ्या