निवृत्तीसाठी वित्तीय नियोजन सुरू करण्याचे योग्य वय काय?

निवृत्तीसाठी वित्तीय नियोजन सुरू करण्याचे योग्य वय काय?

निवृत्ती नियोजनासाठी गुंतवणूक करणे सुरू करण्याची योग्य वेळ आजच आहे, मग तुमचे वय आणि वित्तीय परिस्थिती कशीही असो. तुम्ही जेवढ्या लवकर एखाद्या उद्दिष्टासाठी गुंतवणूक सुरू करता, तेवढाच अधिक वेळ तुमच्या पैशाला एकत्रीकरणासाठी मिळतो. समजा, जर तुम्ही आज 30 वर्षे वयाचे आहात, आणि पुढील 30 वर्षांसाठी रु. 2000चे मासिक एसआयपी सुरू करता. तर तुमच्या पैशाला एकत्रीकरणासाठी भरपूर वेळ मिळतो. वार्षिक परताव्याचा दर आपण जर 12% धरला, तर 30 वर्षांमध्ये तुमची बचत 7.2 लाख रुपायांची होईल आणि एकूण निवृत्तीचा निधी 70 लाख एवढा होईल.

जर हाच एसआयपी तुम्ही दहा वर्षांनंतर सुरू केलात, तर 20 वर्षांमध्ये तुमची बचत 4.8 लाख रुपायांची होईल आणि एकूण निवृत्तीचा निधी 20 लाख एवढा होईल. तुम्ही पाहू शकता की 10 वर्षांचा उशीर केल्याने तुमचा निवृत्तीचा निधी एक तृतीयांशच राहिला. दुर्दैवाची गोष्ट ही की बहुतांश लोकांना दिर्घाकाळात एकत्रीकरणाची शक्ती कळत नाही आणि ते त्यांच्या निवृत्तीसाठी अधिक मोठा निधी तयार करण्याची संधी गमावून बसतात. गुंतवणूक काही वर्षे उशीरा सुरू केल्याने वेळेचे नुकसान होते आणि त्यामुळे पैशाला अनेक पटींने वाढण्याची संधी मिळत नाही.

प्रत्येकाने त्यांच्या पहिल्या नोकरीमध्ये स्थायी झाल्याबरोबर स्वतःच्या वित्तीय उद्दिष्टांचे नियोजन करणे आणि त्या उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करणे सुरू केले पाहिजे. शेवटी, धैर्याने दिर्घकालीन गुंतवणूक करणाराच शर्यतीत जिंकतो.

*कृपया नोंद घ्या की हि गणना केवळ उदाहरणादाखल आहेत आणि ते प्रत्यक्ष परतावे दर्शवत नाहीत. म्युचुअल फंड्सवर नियत मिळकतीचा दर (फिक्स्ड रेट ऑफ रिटर्न) मिळत नाही आणि मिळकतीच्या दराचे (रेट ऑफ रिटर्न) अनुमान लावणे अशक्य असते.

454

म्युच्युअल फंड सही आहे?