निवृत्तीमध्ये गॅरंटी असलेले उत्पन्नाचे साधन म्हणून वार्षिकी मिळवण्यासाठी पेंशन प्लॅन असतात. तरीही, त्यांत आकस्मिक गरजांसाठी रोख रक्कम मिळणे शक्य नसते आणि यात विभाजन आणि गुंतवणुकीच्या पद्धतींसाठी वाव फार कमी असतो. पेंशन प्लॅनसाठी भरलेल्या प्रीमियमवर करामध्ये सूट सुद्धा मिळते.म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी वर करामध्ये सूट फक्त इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्किम मध्ये मिळते, पण म्युच्युअल फंडांमध्ये तुम्हाला तुमचे निवृत्ती नियोजन तुमच्या गरजांप्रमाणे करण्यासाठी खूपसे पर्याय उपलब्ध आहेत.
जर तुम्ही तरुण असलात, तर तुम्ही अशा इक्विटी फंडांमध्ये एसआयपी सुरू करू शकता जे तुमच्या जोखीम प्राधान्याप्रमाणे असतील आणि निवृत्तीच्या जवळ पोहोचेपर्यंत एसआयपी सुरू ठेवू शकता. त्या वेळेपर्यंत तुमचा निधी बराच वाढलेला असेल ज्याला निवृत्तीच्या 2-3 वर्षांपूर्वी तुम्ही एसटीपी (सिस्टेमॅटिक ट्रांसफर प्लॅन) द्वारे शॉर्ट टर्म डेब्ट फंडांमध्ये ट्रांसफर करू शकता ज्याने त्यातील जोखीम कमी होईल. जर तुम्ही योग्य वेळी एसआयपी द्वारे निवृत्तीसाठी नियोजन केले नसेल, पण
अधिक वाचा