अनेक लोक म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी याच कारणाने उत्सुक असतात की म्युच्युअल फंड दिर्घकालामध्ये संपत्तीच्या इतर प्रकारांपेक्षा अधिक चांगला परतावा देण्यास सक्षम असतात, पण अशा लोकांना हे माहीत नसते की सुरुवात कशी करावी. म्युच्युअल फंडांमध्ये जोखीम असल्यामुळे, बहुतांश लोकांना आपल्या मेहनतीचा पैसा त्यांत ठेवणे संशयित वाटते. ते नेहेमी गुंतवणूक करण्यासाठी अशा फंडाच्या शोधात असतात जो त्यांना म्युच्युअल फंडाचे फायदे तर देऊ करेल, पण त्यात जोखीम नसेल.
तसे पाहू गेल्यास, फुकटात काहीच मिळत नाही, त्यामुळे अशा शून्य-जोखीम फंड आस्तित्वातच नाही जो इतर म्युच्युअल फंडांसारखा परतावा देऊ शकेल. तरीही, ओव्हरनाइट फंड या कल्पनेच्या सर्वात जवळ आहेत. असे फंड लगेच दुसऱ्या दिवशी ज्यांची मुदत-पूर्तता होणार अशा रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळेच यांत रोख रक्कम अधिक असते आणि यांत अत्यल्प जोखीम असतो. पण या फंडांद्वारे तुमच्या पोर्टफोलिओद्वारे दिर्घकालामध्ये तुम्हाला गरजेचा असलेला परतावा मिळणे कठीण असते. जर तुम्हाला आपल्या आयुष्याची बचत म्युच्युअल फंडांमध्ये ठेवण्याआधी अगदी लहान स्वरूपात म्युच्युअल फंड वापरून पाहायचे असतील, तर ओव्हरनाइट फंड योग्य आहेत.
पण या फंडांचा वापर तेव्हाच करावा जेव्हा तुम्हाला खूपसा पैसा फार कमी कालावधीसाठी ठेवायचा असेल, किंवा तुम्हाला गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडांची सवय करून घ्यायची असेल. हे फंड म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी मॅचच्या आधी केल्या जाणाऱ्या नेट प्रॅक्टिससासखे आहेत.