इंडेक्स फंडामध्ये कोणी गुंतवणूक करावी?

इंडेक्स फंडामध्ये कोणी गुंतवणूक करावी? zoom-icon

एखाद्या विशिष्ट शेअर बाजार निर्देशांकांच्या (जसे की BSE सेन्सेक्स, निफ्टी 50, निफ्टी मिडकॅप इंडेक्स इ.) कामगिरीचा मागोवा घेण्यासाठी डिझाइन केलेला एक प्रकारचा म्युच्युअल फंड म्हणजे इंडेक्स फंड होय. निर्देशांकाच्या रचनेशी मिळताजुळता सिक्युरिटीज पोर्टफोलिओ ठेवून त्या विशिष्ट बेंचमार्क निर्देशांकांच्या गुंतवणुकीच्या परताव्याची प्रतिरूप तयार करणे हे या फंडांचे उद्दिष्ट असते. पण इंडेक्स फंडामध्ये कोणी गुंतवणूक करावी? 

इंडेक्स फंड हा तुलनेने कमी जोखीम घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आदर्श गुंतवणूक पर्याय आहे कारण हे फंड विशिष्ट बाजार निर्देशांकांना निर्देशित करतात, ज्यामुळे त्यांना इक्विटी संबंधित जोखमींना कमी सामोरे जावे लागते. तथापि, बाजारात पडझड झाल्यास त्यामध्ये जोखीम आणि अस्थिरता असतेच.  

म्युच्युअल फंडांमध्ये नव्याने गुंतवणूक करू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा योग्य पर्याय ठरू शकतो. याचे कारण कालांतराने इंडेक्स फंडांमधील गुंतवणूक इंडेक्सच्या कामगिरीशी जुळण्यासाठी किंवा त्याचा मागोवा घेण्यासाठीही फक्त त्या इंडेक्स फंडाच्या पोर्टफोलिओ मॅनेजरवर अवलंबून असते. 

इतिहास पाहता इंडेक्स फंड हे दीर्घकालीन गुंतवणुकीवर चांगला ते मध्यम परतावा देणारे म्हणून प्रसिध्द आहेत, ज्यामुळे ते दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ते योग्य पर्याय ठरतात.

इंडेक्स फंड साधारणपणे मध्यम/उच्च जोखमीचे मानले जात असले तरी त्यांच्या काही संभाव्य मर्यादा आहेत ज्यामध्ये पुढील बाबींचा समावेश असतो:

•    नॉन-इंडेक्स फंडांच्या तुलनेत असलेली मर्यादित लवचिकता. 
•    फंड व्यवस्थापकाकडून निवडलेल्या निर्देशांकाचा अचूक मागोवा न घेतला जाण्याचा धोका असतो.
•    ज्या निर्देशांकाशी मिळतीजुळती कामगिरी करायची आहे त्याच्या तुलनेत फंडाची कामगिरी कमी होण्याची शक्यता असते. 

थोडक्यात, इंडेक्स फंडातील गुंतवणूक प्रामुख्याने, गुंतवणूकदाराची जोखीम घेण्याची क्षमता, आर्थिक उद्दिष्टे यासारख्या गुंतवणुक घटकांवर अवलंबून असते. वरील वैशिष्‍ट्यांमुळे या फंडातील गुंतवणुकीवर परिणाम करणारे घटक कोणते हे निश्चित करण्यास मदत होते. 

अस्वीकरण 
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

285