एसआयपीमध्ये गुंतवणूक करावी की एकदाच (एकरकमी) गुंतवणूक करावी? यापैकी एकाची निवड करणे, हे आपला म्युच्युअल फंड्स बरोबर असलेला परिचय, आपल्याला ज्या फंड्स मध्ये गुंतवणूक करायची आहे ते आणि आपले उद्दिष्ट यावर अवलंबून असते. जर आपल्याला एखाद्या उद्दिष्टासाठी पुरेसे भांडवल जमा करण्यासाठी नियमित गुंतवणूक करायची असेल, तर एसआयपी मधून योग्य अशा इक्विटी स्किम मध्ये गुंतवणूक करा. तसेच आपल्या मासिक उत्पन्नामधून पैसे वाचवायचे असतील आणि जिथे आपण आपले पैसे लक्षणीयरित्या वाढवू शकता असा एक पर्याय निवडायचा असेल, ज्यामुळे दीर्घ काळात आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी पुरेसे पैसे असतील, तर एसआयपी हे उत्तर आहे. गरज भासल्यास कृपया वित्त तज्ञाची मदत घ्यावी.
जर आपल्याकडे बोनस, मालमत्ता विक्रीतून आलेले उत्पन्न किंवा निवृत्ति निधी यासारखी अतिरिक्त रक्कम असेल, पण ती कशी वापरायची याबद्दल खात्री नसेल, तर एखाद्या डेब्ट किंवा लिक्विड फंड मध्ये एकरकमी गुंतवणूक करा. एसआयपी हे इक्विटी अभिमुख स्किम्स मध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहेत, तर एकरकमी गुंतवणूक ही डेब्ट फंड्स साठी योग्य आहे. जर आपण नवीन म्युच्युअल फंड्स गुंतवणूकदार असाल, तर एसआयपी आपल्यासाठी योग्य आहे. एसआयपीचे लाभ सिद्ध होण्यासाठी दीर्घ कालावधीची गरज असते. जर बाजाराचा कल वर जाण्याकडे असेल आणि हे दीर्घ काळ सुरू राहील, असे आपल्याला वाटत असेल, तर आपण एकरकमी पैसे गुंतवू शकता. एसआयपी हे मोठ्या प्रमाणावर चढउतार होणार्या बाजाराच्या परिस्थितीसाठी योग्य आहे.