लोकांना बरेचदा असे वाटते की म्युच्युअल फंड हे फक्त श्रीमंत लोकांनी गुंतवणूक करण्यासाठी आहेत. खरे तर:कोणत्याही व्यक्तीला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या रक्कमेची आवश्यकता नसते. अगदी कमीत कमी म्हणजे आपण निवडलेल्या फंडनुसार ₹ 500 किंवा 5000 इतक्या रकमेपासूनही सुरुवात करु शकता.
कमीत कमी रक्कम इतकी कमी का ठेवली गेली आहे?
जर आपण विमान प्रवास विचारात घेतला, तर आपल्याला प्रमाणित अर्थव्यवस्था सहज समजून घेता येईल. विमानाने प्रवास करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात आणि प्रत्येकाला विमान खरेदी करणे परवडणारे नसते! पण, आपल्याला सगळ्यांना विमान प्रवास परवडू शकतो कारण सगळ्या किंमती ह्या प्रवाशांना वेळोवेळी देण्यात येणा-या सेवांनुसार विभागण्यात आलेल्या असतात.
तसेच,एखाद्या व्यक्तीकडे मोठ्या आकड्यांच्या गुंतवणूक विस्ताराने वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी पुरेसे पैसे नसतील, एखाद्याकडे गुंतवणुकीवर अभ्यास करण्यासाठी किंवा तो खरेदीसाठी संशोधन करण्यासाठी पैसे नसतील. पण,प्रमाणित अर्थव्यवस्थेनुसार लहान गुंतवणुकदारही म्युच्युअल फंडाचे जास्तीत जास्त फायदे घेऊ शकतो.
म्हणूनच म्युच्युअल फंड्स हे लहान गुंतवणूकदारांसाठी बचत आणि गुंतवणूक करण्याचे योग्य साधन आहे.