मी ELSS मध्ये SIP करू, का एकरकमी गुंतवणूक करू?

मी ELSS मध्ये SIP करू, का एकरकमी गुंतवणूक करू? zoom-icon

ELSS मध्ये SIP च्या माध्यमाने किंवा एकरकमी गुंतवणूक करावी हे सर्वस्वी यावर अवलंबून असते की आपण केव्हा आणि कशासाठी गुंतवणूक करीत आहात. जर आपल्याला आर्थिक वर्षाच्या शेवटी कर-बचत करण्यासाठी गुंतवणूक करणे गरजेचे असेल, तर एकरकमी गुंतवणुकी शिवाय पर्याय नाही. पण जर आपण आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला गुंतवणूक करीत आहात, तर आपण एकरकमी किंवा SIP द्वारे गुंतवणूक करू शकता. ELSS मध्ये कर-लाभ असतात आणि त्यात इक्विटीमुळे वाढ होण्याची शक्यता सुद्धा असते.

SIP द्वारे ELSS मध्ये गुंतवणूक करण्याचे दोन फायदे आहेत. पहिला फायदा, आपण संपूर्ण वर्षामध्ये आपली गुंतवणूक करता त्यामुळे जोखीम कमी होते. दुसरा फायदा, आपण निरनिराळ्या एनएव्ही वर गुंतवणूक करता त्यामुळे आपल्या यूनिट्सची सरासरी किंमत संपूर्ण वर्षाच्या कालावधीमध्ये कमी होते, याच्या तुलनेत एकरकमी गुंतवणूक केली तर हा फायदा मिळत नाही आणि याचे कारण आहे रुपी-कॉस्ट अॅव्हरेजिंग. तिसरा फायदा, एकरकमी गुंतवणुकीच्या तुलनेत लहान रकमेची नियमित गुंतवणूक केल्याने आपल्या खिशावर फारसा भार पडत नाही, पण आपल्याला याचे मात्र लक्ष ठेवावे लागते की वर्षभरात गुंतवलेली रक्कम तेवढीच आहे जेवढी आपण ELSS साठी राखून ठेवली होती.

ELSS चा लॉक-इन कालावधी 3 वर्षांचा असल्यामुळे, जर आपण आज गुंतवणूक केलीत, तर एकरकमी गुंतवणूक आपण 3 वषे पूर्ण झाल्यावरच काढू शकाल. हा लॉक-इन कालावधी प्रत्येक SIP साठी सुद्धा लागू आहे. जर आपल्याला 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये गुंतवलेली संपूर्ण रक्कम काढून घ्यायची असेल, तर आपल्या SIP च्या शेवटच्या हप्त्याला 3 वर्षे पूर्ण होईपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल.

454