आपल्यांतील अनेक जणांना स्वतःच्या गुंतवणुकींचे व्यवस्थापन करणे जिकीरीचे वाटते. एखाद्या प्रोफेशनल फंड व्यवस्थापन कंपनीमध्ये विविक्षित कामांसाठी लोकांना त्यांच्या शिक्षणाच्या आधारे, तसेच अनुभव आणि कौशल्याच्या आधारे नियुक्त केले जाते.
एक गुंतवणूकदार या नात्याने आपण स्वतःचा आर्थिक व्यवहार स्वतः पाहू शकता, किंवा एखाद्या प्रोफेशनल कंपनी कडून हे काम करवू शकता. आपण जेव्हा यातील दुसरा पर्याय निवडता तेव्हा:
- आपल्याला हे काम कशापद्धतीने उत्तमरित्या करावे हे माहिती नसते - आपल्यापैकी बरेचजण आपला आयकर भरण्याचे काम इतरांकडून करवून घेतात, किंवा आपण सगळेच घराचा आराखडा एखाद्या आर्किटेक्टकडून बनवून घेतो.
- आपल्याकडे यासाठी पुरेसा वेळ नसतो किंवा ते काम करण्याची आपली इच्छा नसते. आपल्याला गाडी चालवता येत असली तरी आपण ड्रायव्हर ठेवतो तसेच हे आहे.
- एखादे काम स्वतः करण्याऐवजी ते दुस-याकडून घेण्याने बचत होण्याची शक्यता अधिक असते. जसे, स्वतःची गाडी घेऊन महागडा प्रवास करण्यापेक्षा ट्रेनने प्रवास करणे स्वस्त पडते.
- आपला वेळ आपण आपल्या आवडी/निवडीची इतर कामे करण्यासाठी वापरु शकता.
म्युच्युअल फंड्सचा सर्वात महत्त्वाचा फायदा हाच आहे की आपल्याला प्रोफेशनल फंड मॅनेजमेंटचा लाभ मिळतो. डावीकडील इन्फोग्राफिक मध्ये इतर फायदे दर्शवलेले आहेत. इतके सर्व फायदे असताना, आपल्याला गुंतवणुकीसाठी इतर गुंतवणुकीच्या पर्यांयाकडे बघण्याचे कारणच उरत नाही.
452