NAV कसा कॅलक्युलेट केला जातो?

NAV कसा कॅलक्युलेट केला जातो?

नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू (NAV) ही म्युचुअल फंड उद्योगातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. हे म्युचुअल फंडच्या प्रति-युनिट मूल्याचे प्रतिनिधित्व करते आणि गुंतवणूकदार किती किमतीला म्युचुअल फंडमधील प्रत्येक युनिट खरेदी किंवा विक्री करतात हे दर्शवते. 

NAV प्रत्येक दिवसाच्या शेवटी अपडेट केला जातो. NAV महत्त्वपूर्ण आहे कारण तो म्युचुअल फंडाची कामगिरी ट्रॅक करण्यास मदत करते. विविध कालावधीत NAV ची तुलना करून गुंतवणूकदार फंडाने कशी कामगिरी केली आहे हे जाणून घेऊ शकतात. नियमित NAV कॅलक्युलेशन आणि प्रकाशन गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीच्या मूल्याबाबत पारदर्शकता प्रदान करते. 

NAV कॅलक्युलेट करण्यासाठी, तुम्हाला फंडाच्या एकूण अ‍ॅसेट व्हॅल्यू मधून त्याची देणी काढून टाकावी लागतात आणि त्याला फंडाच्या एकूण उर्वरित युनिट्सने भागावे लागते.   

एखाद्या मालमत्तेची नेट व्हॅल्यू = (एकूण मालमत्ता – एकूण देणी) / फंडाच्या एकूण उर्वरित युनिट्स         

 

मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे