बहुतांश लोक आपापल्या निवृत्तीबद्दल अगदी निवृत्तीची वेळ जवळ येऊन ठेपल्याशिवाय विचार करीत नाहीत. त्यांचे संपूर्ण आयुष्य एका मागून एक अशा गरजा पूर्ण करण्यातच खर्ची पडते, जसे वाहन घेणे, आपले घर करणे, कुटुंब वाढवणे, मुलांचे शिक्षण आणि त्यांचे लग्न इत्यादी. या जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर आपण हे पाहातो की आपल्याकडे जबळ येऊन ठेपलेल्या निवृत्तीसाठी किती पैसा उरलेला आहे. त्या वेळी लोक आपल्या आयुष्यभराची बचत कुठेतरी गुंतवण्याचा विचार करतात ज्याने निवृत्तीचा काळ सुरू होण्याआधी थोड्याच कालावधी मध्ये त्यांना खूप चांगला परतावा मिळू शकेल. आपल्याला पुढीत 15 ते 30 वर्षांसाठी आराम, सुरक्षा, पोषण आणि स्वास्थ्य सेवांची सर्वात अधिक गरज आयुष्याच्या याच टप्प्यावर पडते आणि यात नियमित मिळकत आपल्याकडे नसते, आयुष्याच्या अशा टप्प्याचे नियोजन करण्याचा हा मार्ग चुकीचा आहे.
या टप्प्यासाठी नियोजन लवकरात लवकर सुरू केले पाहिजे. आपली मिळकत किंवा जीवन-शैली कशीही असो, आपण आपले सर्व खर्च पूर्ण केल्यानंतर आणि आपल्या वित्तीय जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर महिन्याच्या शेवटी काही पैशांची बचत निश्चितच करू शकता जो पैसा सर्व बिले आणि इतर जबाबदाऱ्यांचे, म्हणजे कारचा हप्ता, गृहकर्जाचा हप्ता, मुलांसाठी गुंतवणूक, आणीबाणीच्या परिस्थितीसाठी निधी यांचे पैसे भरल्यावर आपल्यापाशी उरतो. जरी ही रक्कम फारच कमी असली, तरीही याची गुंतवणूक योग्य साधनांमध्ये केल्याने आपण दिर्घाकालामध्ये मालमत्ता निर्मिती करू शकता.
यासाठी म्युच्युअल फंड पेक्षा अधिक चांगले साधन ते काय असेल! आपण महिन्याकाठी फक्त रु. 500 एवढ्या रकमेने एसआयपी सुरू करू शकता आणि आपली मिळकत/ बचत वाढल्यावर या रकमेत भर घालू शकता. जेव्हा आपण एकत्रीकरणाची जादू पाहाल तेव्हा आपल्याला सुखद आश्चर्याचा धक्का बसेल आणि कुणास ठाऊक, शेवटी आपल्याला त्या गोष्टीत सांगितलेल्या प्रमाणे सोन्याच्या अंड्यांची पिशवीच मिळेल!