म्युच्युअल फंडस रिडीम कसे करावे?

म्युच्युअल फंडस रिडीम कसे करावे? zoom-icon

गुंतवणुकीच्या क्षेत्रात मध्ये फ्लेक्सिबिलिटीला फार महत्व आहे, बऱ्याचदा गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे काढून घेण्याची गरज भासते. वैयक्तिक आर्थिक निकड असताना किंवा एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी गुंतवणूक केलेली असते, जसे की निवृत्ती, टॅक्स क्रेडिट इत्यादि त्याची पूर्तता झाल्यावर गुंतवणूकदार म्युच्युअल फंड्स विकण्याचा निर्णय घेऊ शकतो.

म्युच्युअल फंड्स रिडीम करण्याच्या पद्धती
म्युच्युअल फंड्स ऑन लाइन आणि ऑफलाइन पद्धतीने रिडीम करता येतात, हे एएमसी आणि गुंतवणूकदाराच्या पसंतीवर अवलंबून असते ज्यामध्ये विशिष्ट पायर्‍या आवश्यक असतात:

ऑफलाइन रिडम्शन: एएमसी/आरटीए/एजंट/वितरक
ऑफलाइन रिडम्शन करण्यासाठी रिडम्शनसाठी असलेला अर्ज भरून त्यावर सही करून तो एएमसीच्या किंवा रजिस्ट्रारच्या विशिष्ट ऑफिसमध्ये द्यावा लागतो. एखादा गुंतवणूकदार एजंट किंवा वितरकामार्फत त्यांचे म्युच्युअल फंड रिडीम करण्‍यासाठीचा रीतसर स्वाक्षरी केलेला अर्ज देण्याचा पर्याय निवडू शकतो, जो अर्ज नंतर एएमसी किंवा आरटीए कार्यालयात देण्यात येतो. या अर्जात, धारकाचे नाव, फोलिओ नंबर, रीडीम करायची युनिट्सची संख्या किंवा रक्कम इत्यादि माहिती भरायची

अधिक वाचा