आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओसाठी फंडची निवड ही नवीन कपड्यांच्या निवडीप्रमाणेच असते, फक्त निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची असते एवढेच. ज्याप्रमाणे आपण एखादा शर्ट किंवा ड्रेस निरखून पहाता, त्याची फिटिंग, घट्ट किंवा सैलपणा, त्याची खरेदी ज्या कारणास्तव करीत आहात त्यासाठी ते योग्य आहे किंवा नाही हे ठरवता, तसेच आपल्या पोर्टफोलिओसाठी इक्विटी म्युच्युअल फंडची निवड करताना करावे लागते.
इक्विटी म्युच्युअल फंडसाठी शॉपिंग सुरू करण्याआधी आपल्याला आपला पोर्टफोलिओ तपासावा लागतो. जसे आपण आपल्याकडे आधीपासून असलेल्या कपड्यांपेक्षा निराळे कपडे खरेदी करतो, तसेच आपल्याकडे आधीपासून कुठल्या प्रकारची गुंतवणूक आहे आणि आता कशाची गरज आहे याकडे लक्ष द्या. असे असू शकते की आपल्याकडे आधीपासून काही इक्विटी गुंतवणूक केलेली असेल किंवा इक्विटी मुळीच नसेल असे सुद्धा असू शकते. त्यामुळे नवीन इक्विटी फंड घेतल्यावर त्याने आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओमधील एखादी उणीव भरून काढली पाहिजे. उदाहरणार्थ, जर आपण आधीच एखाद्या डायव्हर्सिफाइड इक्विटी
अधिक वाचा