4-6 वर्षे हा बचत आणि गुंतवणुकीच्या निर्णयासाठी मध्यम कालावधी समजला जातो आणि त्यामुळे इथे भांडवलाचे अधिमूल्यन हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. कॉर्पोरेट बाँड फंड्स आणि हायब्रीड फंड्स भांडवलाच्या अधिमूल्यनासाठी सर्वोत्तम आहेत कारण ते दीर्घकालीन मालमत्ता निर्मितीसाठी आदर्श असलेल्या इक्विटी फंड्स पेक्षा कमी अस्थिर असतात. कॉर्पोरेट बाँड फंड्स हे सरासरी 3-5 वर्षे मुदतपूर्ती असलेल्या उच्च दर्जाच्या बाँड्स मध्ये गुंतवणूक करतात, ज्यामुळे व्याजदरातील बदलाचा त्यांच्यावर कमी परिणाम होतो. हायब्रीड फंड्स प्रामुख्याने थोड्या प्रमाणात इक्विटीचा प्रभाव असलेल्या डेब्ट फंड्स मध्ये गुंतवणूक करतात, ज्यामुळे भांडवलाच्या अधिमूल्यनासाठी सक्षम असलेला एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय उपलब्ध होतो.
मध्यम कालावधीच्या फंड्सचे मूल्यमापन करताना, फंडच्या दीर्घकालीन कामगिरीसाठी अलीकडच्या 3-5 वर्षांच्या पलीकडच्या परताव्यांकडे बघा. बाजाराच्या चढउतारांच्या सर्व टप्प्यांवर ते सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत हे बघा. बहुतेक सर्व फंड्स एका सेक्युलर बुल रन मध्ये म्हणजेच जेव्हा बाजार वर जात असेल तेव्हा चांगली कामगिरी करतील, परंतु बाजार खाली जात असताना जो फंड अधिक चांगले परतावे देईल तो बराच काळ सातत्याने परतावे देईल. आपल्याला 3-5 वर्षे गुंतवणूक करायची असल्यामुळे आणि या काळात जर बाजारात मंदीसारखे वातावरण असेल, तर आपल्याला सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या फंड्स मध्ये गुंतवणूक केल्यामुळे फायदा होईल. चांगली कामगिरी देणाऱ्या योग्य फंडच्या निवडीसाठी म्युचुअल फंड व्यवस्थापित करणाऱ्या विश्वासार्ह अशा संस्थेची किंवा वित्त सल्लागाराची अथवा तज्ञाची निवड करा.