ULIP म्हणजे युनिट-लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन. ही आयुर्विमा पॉलिसी आहे, ज्यामध्ये एक गुंतवणुकीचा घटक असतो, ज्याची विविध बाजारपेठांमध्ये गुंतवणूक केली जाते. ह्या गुंतवणूक घटकांपासून मिळणारा परतावा हा ह्या पॉलिसीचे मूल्य ठरवतो. परंतु, पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर मिळणारी रक्कम ही बाजारपेठेचा घटक असेलच असे नाही. मिळणाऱ्या किमान रकमेवर कदाचित मिळणा-या रकमेवर ह्याचा काही परिणाम होत नाही. दुसर्या शब्दात सांगायचे झाले तर, ULIP हे हायब्रीड उत्पादन आहे, ज्यात गुंतवणूक आणि विमा ह्यांचा मेळ घातलेला आहे.
ULIP मधील गुंतवणूक पर्याय हा म्युच्युअल फंडासारखा आहे.
1. दोन्हीही व्यवस्थापित गुंतवणुकी आहेत.
2. दोन्हीसाठी, व्यावसायिकांचा गट गुंतवणूक आणि विशिष्ट उद्देशाने फंड मध्ये केलेली गुंतवणूक ह्यांचे व्यवस्थापन करत असतो.
3. गुंतवणूकदारांना खरेदी करताना युनिट्स दिलेले असतात आणि त्याला ठराविक कालावधीने घोषित केलेली प्रति युनिट NAV असते.
ULIP ही विमा पॉलिसी असल्यामुळे, जर प्रिमियम नियमित भरला जात नसेल तर विमा कवच स्थगित केले जाऊ
अधिक वाचा