आपल्याला रात्रीच्या जेवणासाठी भाजीपाला कुठून मिळेल? आपण तो आपल्या अंगणात पिकवता की आपल्या गरजेनुसार जवळच्या भाजी बाजारातून/सुपरमार्केट मधून खरेदी करता? स्वत:साठी स्वतःच भाजी पिकवणे हा आरोग्यदायी अन्न खाण्याचा उत्तम मार्ग आहे, पण बियाण्यांची निवड, खत घालणे, पाणी देणे, किडीपासून संरक्षण वैगेरे ह्या गोष्टींसाठी कष्ट पडतात. तर आता पुढचा पर्याय आपल्याला कोणतेही कष्ट न घेता भाज्यांच्या विविध प्रकारांमधून निवड करण्यास वाव देतो.
तसेच, आपण कोणत्याही चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये थेट गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करु शकता किंवा म्युच्युअल फंड्स मधून त्यात गुंतवणूक करु शकता. संपत्ती निर्माण तेव्हा होते जेव्हा आपण एखाद्या कंपनीचे स्टॉक्स विकत घेतो, तेव्हा ती कंपनी आपल्या पैशाचा उपयोग त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी करते आणि आपल्यासाठी त्याचे मूल्य तयार करण्यासाठी करतात.
शेअर्स मध्ये गुंतवणूक केल्याने त्यात धोका जास्त असण्याची शक्यता असते. आपल्याला कंपनी आणि सेक्टरचा अभ्यास करून स्टॉक्स निवडण्याची गरज असते. स्टॉक
अधिक वाचा