म्युच्युअल फंड स्किममध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करण्याचे अनेक मार्ग आहेत.
आपण म्युच्युअल फंडच्या किंवा त्या म्युच्युअल फंडच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंटच्या शाखा कार्यालयात किंवा नियुक्त गुंतवणूक सेवा केंद्रामध्ये(ISC) मध्ये चेक किंवा बँक ड्राफ्ट सहित एक योग्य पद्धतीने संपूर्ण भरलेला अर्जाचा फॉर्म भरून म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता.
आपण एखाद्या म्युच्युअल फंडच्या वेबसाईटवरून ऑनलाईन गुंतवणूक करण्याचा पर्याय देखील निवडू शकता.
त्यापुढे जाऊन आपण वित्तीय मध्यस्थाच्या सहाय्याने/मध्यस्था द्वारे, जसे की एखाद्या AMFI बरोबर नोंदणीकृत असलेल्या म्युच्युअल फंड वितरकाद्वारे गुंतवणूक करू शकता किंवा थेट गुंतवणूक, म्हणजेच यामध्ये कोणत्याही वितरकाचा समावेश न करता/वितरकाशिवाय गुंतवणूक करू शकता.
म्युच्युअल फंड वितरक ही एक व्यक्ती किंवा संस्था असू शकते, जसे की बँक, किंवा ब्रोकिंग हाउस किंवा ऑनलाईन डिस्ट्रीब्युशन प्रोव्हायडर.
सध्या आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर गुंतवणूक करण्याचा विकल्प निवडू शकता कारण आजकाल या प्लॅटफॉर्म्स वर सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतलेली असते. खरचं, ही एक आरामदायक आणि सोयीस्कर गोष्ट आहे.