आपण म्युच्युअल फंडच्या एका स्किम मधून दुसर्‍या स्किम मध्ये आपली गुंतवणूक स्थलांतरित करू शकता का?

आपण म्युच्युअल फंडच्या एका स्किम मधून दुसर्‍या स्किम मध्ये आपली गुंतवणूक स्थलांतरित करू शकता का? zoom-icon

एकदा आपण म्युच्युअल फंडच्या स्किम मध्ये गुंतवणूक केलीत की, आपल्याला हवा असलेला कोणताही बदल, मग तो प्लॅन बदलण्याचा (रेग्युलर/डायरेक्ट), पर्याय निवड असो, (ग्रोथ/डिव्हीडंट) असो किंवा एकाच फंड हाऊसमध्ये स्किम्समध्ये केलेला बदल असो तो विक्री (रिडम्पशन)म्हणून समजला जातो. तसे हे काही बदल करणे शक्य जरी असले तरी रिडम्पशन(विक्री)मुळे तुमच्या गुंतवणूकीच्या मूल्यानुसार एक्झिट लोड (निर्गमन भार) आणि भांडवली नफा कर लागू पडू शकतो. स्किम्समध्ये बदल आणि रिडम्पशन(विक्री)ची विनंती करणे ह्यातला फरक म्हणजे आधीच्या परिस्थितीत पैसे थेट नवीन स्किम मध्ये गुंतवले जातात, आणि नंतरच्या परिस्थितीत पैसे आपल्या खात्यात जमा होतात आणि त्यानंतर आपण रिडम्पशनचे उत्पन्न इतर स्किम मध्ये गुंतवणूक करण्याचे निवडू शकता.

जर आपण इक्विटी ओरिएंटेड स्किम मध्ये(इओएस) गुंतवणूक केली असेल, आणि आपण वर्ष पूर्ण होण्याआधीच आपली गुंतवणूक इतर स्किम मध्ये हस्तांतरित केलीत तर आपल्याला एक्झिट लोड (निर्गमन भार) आणि 15% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू पडतो. जर आपण एका वर्षापेक्षा जास्त काळ पूर्ण केला असेल तर त्या ठराविक आर्थिक वर्षात जर नफा हा 1 लाखापेक्षा अधिक असेल तर 10% लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होईल.

452